मुंबई, दि. 29 - बिहारमधील वेगवान राजकीय घडामोडीत जदयू - भाजपाच्या सरकारचे नितीश कुमार यांनी सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 24 तासांत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या एकमेकांची कितीही स्तुती करत असले तरी हेच दोन नेते अगदी 20 महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत एकमेकांवर तुटून पडायचे. बिहार विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाला सोडचिट्टी दऊन लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर युती करत नितीश यांनी बिहारमध्ये आपले सरकार स्थापन केले होते. विधानसभा निवडणुक प्रचाराच्या रणधुमाळीत नीतीशकुमारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एक गाणं लिहिलं होतं. थ्री इडियट या चित्रपटाच्या गाण्यावरुन प्रेरीत हेऊन त्यांनी हे गाण तयार केलं होतं. ते गाणंही त्यांनी एका कार्यक्रमात सादर केलं होतं. या गाण्यातून नीतीशकुमार यांनी मोदींची खिल्ली उडवली होती. प्रचाराच्या काळात हे गाणं जेवढं हिट झालं होत त्यापेक्षाही जास्त आता ते सोशल मीडियात धुमाकूळ घालतंय. काय आहे ते गाणं पाहूयात..बहती हवा सा था वोगुजरात रे आया था वोकाला धन लाने वाला था वोकहाँ गया उसे ढुंडोहमको देश की फिकर सतातीवो बस विदेश के दौरे लगाता.हमको बढती महंगाई सताती हैओ बस मन की बात सुनाता हैहर वक्त अपनी सेल्फी खिचता था वोदाऊद को लाने वाला था वोकहाँ गया उसे ढुंडोपण म्हणतात ना राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो, हे नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. बिहारमधील सध्याचे राजकीय चित्र स्पष्टपणे बोलून दाखवत आहे. ज्या भाजपाची नितीशकुमार यांनी खिल्ली उडवली होती आता त्यांच्याच पाठिंब्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत.
बुधवारी संध्याकाळी नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत बिहारच्या राजकीय वर्तुळात भूकंप आणला होता. संपूर्ण देशबांधवांसाठी हा अनपेक्षित धक्काच होता. पण त्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच मोदींनी नितीशकुमाराच्या या निर्णयाचं कौतुक करत जे काही ट्विट केलं होतं ते पाहून हळूहळू बिहारच्या राजकारणातलं बदललेलं चित्र स्पष्ट होऊ लागलं. त्यानंतर भाजपाच्या साथीनं त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
दरम्यान, बिहारमधील वेगवान राजकीय घडामोडीत शुक्रवारी जदयू - भाजपाच्या सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सभागृहात बहुमत सिद्ध केले. सरकारच्या बाजूने १३१ तर विरोधात १०८ मते पडली. बहुमतासाठी १२२ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता होती. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत भाग घेताना नितीश कुमार यांनी भ्रष्टाचार आणि अन्याय करणाºयांना बिहार खपवून घेणार नाही, असे स्पष्ट करून विरोधकांचा समाचार घेतला. तर, राजदचे नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनीही नितीश कुमार यांच्यावर जोरदार पलटवार केला. भाजपासोबतच जायचे होते तर आमच्यासह सरकार का बनविले, असा सवाल करून तेजस्वीप्रसाद म्हणाले की, हे सर्व एकाच व्यक्तीच्या स्वार्थासाठी केले गेले. हिंमत असती तर नितीश कुमार यांनी मला बरखास्त करून दाखविले असते. पण तसे न करता नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेचा अपमान केला. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत बोलताना नितीश कुमार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, वेळ येईल तसे प्रत्येक गोष्टीचे उत्तर देईन. आज जुम्मा (शुक्रवार) असल्याने सभागृहाचा वेळ वाया जाऊ नये असे आपल्याला वाटते.