संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची जदयूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. ललन सिंह यांना अखेर राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून राजीनामा द्यावा लागला.
लालूप्रसाद यादव व ललन सिंह हे नितीशकुमार यांना हटवून तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्याच्या प्रयत्नात होते, असा आरोप केला जात आहे. नितीशकुमार यांचे ३५ वर्षे निकटवर्तीय राहिलेले ललन सिंह यांना पक्षाचे अध्यक्षपद सोडावे लागले. जदयूच्या सूत्रांनी सांगितले की, बिहारमध्ये ललन सिंह जदयूच्या १२ आमदारांना फोडणार असल्याची चर्चा होती. मात्र, नितीशकुमार यांनी त्यांचा डाव उलटवला.