शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपाबरोबर जाण्याच्या विचारात?; राजकीय भूकंप होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 8:22 AM

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात इतर मित्रपक्षांना बरोबर घेऊन काम करावे लागेल, याची भाजप नेतृत्वाला जाणीव झाली आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमधील खळबळजनक घडामोडीनंतर विरोधी पक्षांमध्ये प्रचंड गोंधळ आणि गदारोळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपबरोबर जाण्याच्या विचारात असल्याचे वृत्त पाटण्यातून येत आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी नितीशकुमार यांची भेट घेतल्यामुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संदेशवाहक म्हणून काम करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात इतर मित्रपक्षांना बरोबर घेऊन काम करावे लागेल, याची भाजप नेतृत्वाला जाणीव झाली आहे. याचमुळे दुरावलेला भागीदार अकाली दलाला एनडीए आणि केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यावर फेरविचार झाला असावा. भाजपने अकाली दलाचे अध्यक्ष व लोकसभा खासदार सुखबीर सिंह बादल यांनाच त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर यांच्याऐवजी मंत्रिमंडळात सहभागी होण्यास सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वाने कर्नाटकात जनता दल (एस)बरोबर युती करण्याचे ठरवले आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांना आता राज्यपाल म्हणून पाठवले जाऊ शकते, असे संकेत आहेत. कारण त्यांच्या पत्नी ज्या काँग्रेसच्या विद्यमान खासदार आहेत त्या नंतर भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात. दरम्यान, वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी बुधवारी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली. ते एनडीएमध्ये सामील होऊ शकतात; परंतु विधानसभा निवडणुकीनंतरच. इतर पाच राज्यांसह नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये लवकर विधानसभा निवडणुका घेण्यासाठी ते इच्छुक आहेत. विधानसभा जिंकल्यानंतर ते लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये सामील होऊ शकतात. त्यांना आंध्र प्रदेशात भाजप- टीडीपी युती रोखायची आहे. कारण त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर आणि पक्षाच्या सदस्यांविरुद्ध सीबीआय आणि ईडीचे १७ खटले आहेत.

  • सुखबीर सिंह बादल यांना कॅबिनेट पदाची ऑफर
  • अमरिंदर सिंह यांना राज्यपाल करणार?
  • जगन रेड्डी यांना आंध्रात हव्यात लवकर निवडणुका
  • हरिवंश यांनी नितीशकुमार यांची भेट घेतल्याने बिहारमध्ये खळबळ
टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी