पाटणा, दि. 27 - संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांनी बुधवारी (26 जुलै ) तडकाफडकी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपाने त्यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा जाहीर केला आहे. बिहारमधील महायुती फूट पडल्यानंतर मात्र येथील राजकीय परिस्थिती पूर्णतः बदलली आहे.
बिहारमधील राजकीय घडामोडीनितीश कुमार यांनी बिहारच्या राजकारणात विरोधकांच्या खुर्चीत असलेल्या भाजपासोबत हातमिळवणी केली. नितीश कुमार यांना भाजपाचं समर्थन मिळाल्यानंतर जदयू व भाजपाचे आमदार राजभवनात पोहोचले आणि त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. राजभवनातून बाहेर आल्यानंतर भाजपाचे नेते सुशील कुमार मोदी यांना सांगितले की, राज्यपालांनी नितीश कुमार यांना गुरुवारी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले आहे.
तेजस्वी यादव यांचा विरोधतर दुसरीकडे आरजेडी नेता तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना सत्तास्थापना आणि शपथविधिसाठी देण्यात आलेले आमंत्रणाला विरोध दर्शवला आहे. याविरोधात आरजेडी व काँग्रेसच्या आमदारांनी बुधवारी रात्री राजभवनापर्यंत मोर्चादेखील काढला. आरजेडी नेत्यांसोबत राज्यपालांची भेट घेतल्यानंतर तेजस्वी यादव म्हणाले की, पार्टीनं राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांच्या शपथविधिबाबत पुन्हा समीक्षा करण्याची विनंती केली आहे. शिवाय, कायद्यानुसार त्यांनी मोठ्या राजकीय पक्षाला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी बोलावले पाहिजे.
पुढे ते असेही म्हणालेत की, नितीश कुमार अखेर कोणत्या आधारावर भाजपासोबत सत्तास्थापन करत आहेत. ते 28 वर्षांच्या एका मुलाला घाबरलेत. त्यांच्यात हिम्मत असल्यास त्यांनी पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे. नितीश कुमार महायुती तोडून भाजपासोबत हातमिळवणी करण्यासाठी केवळ निमित्त शोधत होते, असा आरोपही तेजस्वी यादव यांनी केला आहे.
''बिहारच्या जनतेचा विश्वासघात''दरम्यान, तेजस्वी यादव व लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणासंबंधी सीबीआय व ईडीनं कारवाई केल्यापासून बिहारमधील महायुतीत गोंधळ निर्माण झाला. तेजस्वी यादव यावर म्हणालेत की, आमच्याविरोधात कटकारस्थान रचून आरोप करण्यात आलेत. शिवाय, नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेचा विश्वासघात केल्याचेही ते म्हणालेत.
Sushil Modi is not even a Bihari, he is an outsider, so these people don't care about Bihar's development or its ppl: Tejashwi Yadav pic.twitter.com/CpZNVAkevD
— ANI (@ANI_news) July 26, 2017
Amit Shah had said he wants to see BJP in power in every state, so they are trying all means to break us: Tejashwi Yadav pic.twitter.com/pdMUAhyZQj
— ANI (@ANI_news) July 26, 2017
राज्यपाल से मिलने का माँगा समय।सबसे बड़ा दल होने के नाते करेंगे सरकार बनाने का दावा।BJP के ख़िलाफ़ चुनकर आए जदयू विधायको का भी मिलेगा समर्थन
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) July 26, 2017
Nitish Ji if u hv belief in ur morality & honesty thn Y u hv caged JDU MLAs in ur https://t.co/0XdOQXDH8T thm,they wil tell ur morality rate
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) July 26, 2017
If Nitish Ji is proud of his moral values & honesty, He would not had been in midnight rush to stake claim for govt. Honest man doesn't fear
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) July 26, 2017
We are going to governor house to stage the dharna if not called for being the single largest party.
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) July 26, 2017
राज्यपाल महोदय रातों रात फैसला क्यों बदल रहे है? निर्धारित शाम 5 बजे की जगह सुबह 10 बजे शपथ ग्रहण।हम राजभवन जा रहे है।
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) July 26, 2017
Governor gv us time of 11AM and now suddenly has asked NDA for oath ceremony at 10AM. Why so much hurry & rush Mr. Honest & Moral?
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) July 26, 2017