Nitish Kumar, Bihar Politics: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आता सर्वांच्या नजरा बिहारकडे लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बिहारमध्येहीराजकारण रंगले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आतापर्यंत सत्ताधारी पक्ष जेडीयूकडून यासाठी स्पष्ट नकार दिला जात आहे. नितीश कुमार यांचा पक्ष पहिल्या दिवसापासून म्हणत आहे की बिहारमध्ये कोणताही राजकीय खेळी होणार नाही. पण या दरम्यान आता काही अशा गोष्टी घडताना दिसल्या आहेत की त्यामुळे राजकीय घटनाक्रम बरंच काही सांगून जातो आणि त्यावरूनच बिहारचे महाआघाडीचे सरकार स्वत: नितीश कुमारच पुन्हा पाडू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.
नितीशकुमारांनी सरकार बनवले आणि पाडले!
नितीशकुमारांचे राजकारण समजून घेणे अवघडच नाही तर अशक्य आहे. नितीशकुमार सायलेंट मोडमध्ये गेले तर ते समजण्यास अधिकच कठीण होतात. नितीशकुमार सध्याच्या राजकारणात पूर्णपणे सक्रिय असले तरी त्यांच्या पक्षाचे नेतेही सातत्याने वक्तव्ये करत आहेत. पण त्यामागील राजकारण आधी समजून घ्यावे लागेल. राजकीय पंडित सांगतात की नितीशकुमार यांची स्वतःची एक विचारपद्धती आहे. त्याच घटनाक्रमाने नितीशकुमार स्वत: सरकार बनवतात आणि नंतर पाडतात.
श्रावण महिन्याशी नितीश कुमारांचा संबंध काय?
बिहारमध्ये सध्या 2017 सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. लालू-राबडींसोबतच सीबीआयने तेजस्वी यादव यांनाही 'लँड फॉर जॉब्स' प्रकरणात आरोपी बनवले आहे. तेव्हापासून बिहारमधील सरकारची स्थिती डळमळीत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बिहारमध्ये कधीही काहीही होऊ शकते. या गोष्टींचा संबंध श्रावण महिन्याशी जोडला जात आहे. नितीशकुमार श्रावणातच सरकार बनवतात आणि पाडतातही. 2017 असो वा 2022, श्रावण महिन्यातच नितीशकुमार यांनी राजकीय सत्ताबदल करून सरकार पाडले आणि नंतर पुन्हा नवे सरकार श्रावणातच स्थापन केले.
नितीशकुमारांची विचारपद्धती समजून घ्यायची म्हटल्यास, नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची राजभवनात भेट घेतली होती. त्याच दिवशी भाजप नेते सुशील मोदी यांनीही राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नितीशकुमार यांनी आपल्या आमदार आणि खासदारांची वन-टू-वन भेट घेतली. यादरम्यान त्यांनी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांचीही भेट घेतली. दोन्ही नेते कधी भेटले याबद्दल कुणालाही नीट माहिती नाही. हरिवंश नारायण सिंह यांनी पाटणा सोडले तेव्हा मीडियाला यासंबंधी थोडी माहिती मिळाली. पण या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
दुसरीकडे, नितीश कुमार ज्या आमदार-खासदारांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटायचे आणि ते बाहेर आल्यावर तेच बोलायचे की नितीशकुमार यांनी फीडबॅक घेण्यासाठी बोलावले होते. आता प्रश्न असा पडतो की, अचानक नितीश कुमार आपल्या आमदार-खासदारांकडून फीडबॅक का घेऊ लागले आहेत? नितीश कुमारांच्या मनात काय चालले आहे? हे असे प्रश्न आहेत. त्यामुळे राजकीय उलथापालथ होणार की काय, असे बोलले जात आहे.