नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या जागावाटपात केवळ तीन जागा मिळाल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री नितीशकुमार, राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या धर्मनिरपेक्ष आघाडीवर जोरदार हल्ला चढविला आहे. आघाडीत मुस्लीम चेहरा असावा असे नितीशकुमार आणि लालूंना अजिबात वाटत नाही आणि मुस्लीम मते आपलीच आहेत असे गृहित धरून त्यांनी आपापल्या पक्षात मुस्लीम नेत्यांना नेहमीच दाबण्याचा प्रयत्न केला, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस खासदार तारिक अन्वर यांनी केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या स्थानिक नेत्यांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत विचारविमर्श करीत आहे आणि १८ आॅगस्टनंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे अन्वर यांनी सांगितले. संयुक्त जनता दल-राजद-काँग्रेस आघाडीवर थेट हल्लाबोल करताना अन्वर पुढे म्हणाले, ‘या लोकांना मुस्लीम चेहरा नकोच आहे. त्यांना दलित चेहराही नको आहे.
नितीशकुमार-लालूंना मुस्लीम चेहरा नको आहे!
By admin | Published: August 16, 2015 10:33 PM