शहरं
Join us  
Trending Stories
1
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान
3
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समीकरणं बदलणार? 
4
वक्फ विधेयकावर आता जमियत उलेमा-ए-हिंदचे मत घेणार; राम मंदिराच्या वकिलांनाही जेपीसीच्या बैठकीचे निमंत्रण
5
Harry Brook, PAK vs ENG: "अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा
6
पॅराग्लायडिंग करत असताना पॅराशूटचा तोल गेला, तरुण खाली कोसळला, पण सुदैवाने वाचले प्राण
7
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
8
"स्वामींनीच त्याला माझ्यासमोर आणलं", केदार शिंदेंनी सांगितलं सूरज चव्हाणच्या निवडीबद्दल
9
दुसऱ्या प्रेग्नंसीवर व्यक्त झाली आलिया भट; म्हणाली, "भविष्यात सिनेमांसोबतच आणखी..."
10
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
11
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
12
Jigra Movie Review: जिगरबाज बहिणीची डेअरिंगबाज कहाणी, आलिया भटचा 'जिगरा' कसा आहे वाचा
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
14
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
15
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
16
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
17
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
18
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
19
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
20
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान

Nitish Kumar : 2014 मध्ये सत्तेवर आलेले 2024 मध्ये राहतील की नाही?; नितीश कुमारांचा मोदी सरकारवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 10:41 AM

Nitish Kumar And BJP, Narendra Modi : सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत स्वत:च्या भविष्याबद्दल चिंता करणे आवश्यक आहे, असा इशाराही नितीश कुमार यांनी दिला.

नवी दिल्ली - भाजपशी दुसऱ्यांदा काडीमोड घेतलेल्या नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून बुधवारी शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचाही शपथविधी पार पडला. सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत स्वत:च्या भविष्याबद्दल चिंता करणे आवश्यक आहे, असा इशाराही नितीश कुमार यांनी दिला. नितीश कुमार यांनी शपथविधीनंतर भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "राजद व अन्य घटक पक्षांबरोबर आम्ही बिहारमध्ये स्थापन केलेले नवीन सरकार आपला कालावधी पूर्ण करणार नाही हा भाजपचा पोकळ दावा आहे. 2014 साली केंद्रात सत्तेवर आलेले भाजपाचे सरकार 2024 साली पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता कमी आहे" असं म्हटलं आहे. 

नितीश कुमार यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकांत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहनही केले आहे. नितीश कुमार यांनी राज्यात नवं सरकार स्थापन केल्यानंतर 2024 मध्ये ते मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची देखील जोरदार चर्चा रंगली होती. मात्र यानंतर त्यांनीच आता मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान पदाच्या उमेदवारीमध्ये आपल्याला रस नसल्याचं नितीश कुमार यांनी म्हटलं. शपथ घेतल्यानंतर त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

"निवडणूक काळात भाजपाचं वागणं योग्य नव्हतं. आमच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. पण त्यांच्याकडून जदयूला हरवण्यासाठीच प्रयत्न केले गेले. मी आमच्या पक्षातील सर्वांशी चर्चा केली. सर्वांच्याच मनात या आघाडीत राहायला नको हीच भावना होती. म्हणून भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला" असं देखील नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. राजभवनामध्ये झालेल्या समारंभात नितीशकुमार यांना राज्यपाल फागू चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची व गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेजस्वी यादव यांनी शपथ घेतल्यानंतर नितीशकुमार यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. 

नितीशकुमार यांनी सरकारचे बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. भाजपचे ७७ सदस्य असून, तो दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. भाजपचा एकही नेता नितीशकुमार यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिला नाही. सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण मिळाले नसल्याचा दावा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री व भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला होता.  नितीशकुमार, तेजस्वी यादव यांच्या शपथविधी सोहळ्याला लालूप्रसाद यादव प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत; पण त्यांच्या पत्नी राबडीदेवी आवर्जून उपस्थित होत्या.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी