- एस.पी. सिन्हापाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव लवकरच सत्तेची सूत्रे हाती घेणार असल्याचे संकेत राजद प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी शुक्रवारी दिले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांना राजद प्रमुख लालूंचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि ते लवकरच देशाचे नेतृत्व करणार, ते मुख्यमंत्रिपद सोडून विरोधकांची एकजूट करण्यासाठी देश यात्रा काढतील, असेही ते म्हणाले.
नितीशकुमार मुख्यमंत्रीपद सोडून देशव्यापी यात्रा काढणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. अशा स्थितीत तेजस्वी यादव यांच्याकडे बिहारचे नेतृत्व येऊ शकते. जगदानंद सिंह म्हणाले की, एच.डी. देवेगौडा यांनी १९९६ साली ज्या प्रकारे लालू यादव यांच्या मदतीने पंतप्रधान झाले होते, त्याचप्रमाणे लालूंनी नितीशकुमार यांना आशीर्वाद दिला आहे.
लालू यांनी नितीश यांना लस टोचल्यानंतर ते लवकरच देशाच्या दौऱ्यावर जातील. लालूंनी लावलेली लस दिसत नाही, पण आज नाही, तर उद्या कुणाला तरी जावे लागेल, म्हणून नितीशकुमार जातील.