शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

नितीश कुमार मुंबई दौऱ्यावर; उद्धव ठाकरे, शरद पवारांची भेट घेणार! 2024 साठी विरोधकांकडून पुढील रणनीतीवर चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 10:49 AM

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांचा समान किमान कार्यक्रम तयार केला जाईल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच सांगितले आहे.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपचा रथ रोखण्यासाठी विरोधकांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विरोधी पक्षनेते सतत एकमेकांना भेटून पुढील रणनीतीवर चर्चा करत आहेत. मात्र, विरोधी पक्षात पंतप्रधानपदासाठी अनेक दावेदार आहेत, त्यामुळे आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात एकाही नावावर एकमत झालेले नाही. 

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे  शरद पवार (Sharad Pawar) यांची लोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची जमवाजमव करण्यासाठी भेट घेणार असल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईत 11 मे रोजी ही महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वीच अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आणि केसीआर यांची भेट घेतली आहे.

दुसरीकडे, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांचा समान किमान कार्यक्रम तयार केला जाईल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच सांगितले आहे. विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे शरद पवार म्हणाले होते. तसेच, येत्या 10-11 महिन्यांत अनेक राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. नितीश कुमार, चंद्रशेखर राव, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी असे नेते विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल?दरम्यान, नितीश कुमारच नाही तर केसीआर यांनी याआधी इतर राज्यांमध्ये जाऊन अखिलेश यादव आणि नितीश कुमार यांसारख्या दिग्गज विरोधी नेत्यांचीही भेट घेतली आहे, परंतु आतापर्यंत विरोधी पक्षातील एकाही नेत्याच्या नावावर पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून एकमत झालेले नाही. विरोधी पक्षात शरद पवार, नितीश कुमार, केसीआर, ममता बॅनर्जी असे अनेक बडे नेते पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जातात.

भाजपसमोर आव्हानविशेष म्हणजे, पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात. या आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक मिळवता येईल का, हे भाजपसमोर आव्हान आहे. दुसरीकडे, भाजपच्या नेतृत्वाखालील युतीच्या बहुमताचा आकडा आधी रोखून आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या रणनीतीवर विरोधक काम करत आहेत. मात्र, यात काँग्रेसची भूमिका काय असेल, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNitish Kumarनितीश कुमारSharad Pawarशरद पवार