नवी दिल्ली : सुरूवातीला काँग्रेस, राजदच्या आघाडीतून सत्ता मिळविणाऱ्या नितीशकुमार यांनी काही वर्षांतच भाजपशी सलगी करून पुन्हा सत्ता स्थापन केली होती. मात्र, बिहारमध्ये पुन्हा राजकारण तापत असून भाजपाच्या नेत्यांनी नितीशकुमार यांना आता लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.
भाजपचे नेते संजय पासवान यांनी नितीशकुमार यांच्याबाबत वक्तव्य केले. गेल्या 15 वर्षांपासून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेले आहेत. आता बस झाले, त्यांनी मुख्यमंत्रपद सोडायला हवे आणि केंद्रात जबाबदारी स्वीकारायला हवी. पुढील मुख्यमंत्रीपद भाजपाला मिळायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली.
जदयूचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वावर आवाज उठविण्यात येत आहे. पासवान यांच्या वक्तव्यावर जदयूच्या नेत्यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. वरिष्ठ नेते रजक यांनी म्हटले की, बिहारमध्ये येऊन काही नेते फालतू वक्तव्ये करत सुटतात. पंतप्रधान मोदी यांनी नितीशकुमार यांची स्तुती केली आहे. पुढील निवडणुकही नितीशकुमार यांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल.
भाजप-जदयूच्या या वाक्युद्धात लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेजस्वी यानेही उडी घेतली आहे. भाजपाच्या नेत्यांच्या वक्तव्याचे खंडण करण्याचे धाडस मुख्यमंत्री दाखवतील का? मोदींच्या नावावर जाहीरनामा बनवत भाजपचाच वापर करून 16 खासदार निवडून आणले? प्रत्येक विधेयकावर ते भाजपाचे समर्थन करतात? मग ते वेगळे कसे? असा सवाल त्यांनी विचारला आहे.