पाटणा - संयुक्त जनता दलाचे (संजद) नेते नितीशकुमार रविवारी सायंकाळी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असले तरी त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकपा) राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याबाबतचा निर्णय घेतलेला नाही.जितनराम मांझी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी संजदचे नवे विधिमंडळ पक्षनेते नितीशकुमार यांना सरकार स्थापनेचे आमंत्रण दिले आणि बिहारमध्ये गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षावर पडदा पडला. नितीशकुमार यांनी आपल्याला १३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता आणि राष्ट्रपती व राज्यपालांसमक्ष या आमदारांना हजरही केले होते. या वेळी राजदचे २४, काँग्रेसचे ५, भाकपाचा १ व १अपक्ष आमदार एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे होते.हे माझे सौभाग्य -विधानसभा अध्यक्षबिहार विधानसभेचे अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी मावळते मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान घेण्यात आलेले निर्णय योग्य, संवैधानिक आणि नियमानुसार होते, असे स्पष्ट करतानाच मांझी यांनी माझ्यामुळे राजीनामा दिला असल्यास ते मी माझे सौभाग्य समजतो, असे प्रतिपादन केले आहे. शनिवारी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त विधान केले.
नितीशकुमार पुन्हा होणार मुख्यमंत्री
By admin | Published: February 22, 2015 2:34 AM