ऑनलाइन लोकमतबिहार, दि. १०- बिहारमध्ये स्वतःच्या कामानं आणि स्वच्छ प्रतिमेनं बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना धोबीपछाड देणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड या पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्रिपदासोबत नितीश कुमारांवर पक्ष सांभाळण्याचं कसबही दाखवावं लागणार आहे. संयुक्त जनता दलाच्या नेतेपदीही नितीशकुमारांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. सलग तीनदा पक्षाचे अध्यक्षपद भूषवणारे 68 वर्षांचे खासदार शरद यादव यांनी राजीनामा दिल्यानं अध्यक्षपदाची जागा रिकामी झाली होती. राजीनामा देते वेळी त्यांनी पक्षाचा कार्यभार नितीश कुमारांकडे सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसारच नितीश कुमार यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
जेडीयूच्या अध्यक्षपदी नितीशकुमार यांची निवड
By admin | Published: April 10, 2016 3:53 PM