शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

नितीशकुमारांची तांत्रिकाला ‘झप्पी’; राजकारण तापले

By admin | Published: October 25, 2015 4:07 AM

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला असतानाच महाआघाडीचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एका तांत्रिकाची भेट घेतल्याचा

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला असतानाच महाआघाडीचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एका तांत्रिकाची भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठे वादळ निर्माण झाले आहे. हा तांत्रिक बिहारच्या सिवान येथील राहणारा असून त्याचे नाव झप्पी बाबा आहे.या व्हिडिओने संयुक्त जनता दलाचे नेते असलेले नितीशकुमारांच्या विरोधकांच्या हाती आयते कोलीत लागले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्यापासून मुक्ती मिळविण्याकरिता नितीशकुमारांना तंत्रमंत्राचा आधार घ्यावा लागला, अशी टीका विरोधकांनी केली आहे. भाजपने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना नितीशकुमार आणि लालूप्रसाद या जोडगोळीवर थेट लक्ष्य साधले. लालूप्रसाद यांच्याकडून सुटका करून घेण्याकरिताच नितीशकुमार यांनी तांत्रिकाची भेट घेतली होती, असा आरोप या पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराजसिंग यांनी केला. विधानसभा निवडणुकीत आपला पराभव निश्चित असल्याचे लक्षात येताच संजद नेते तांत्रिकाला शरण गेले, असेही टीकास्त्र त्यांनी सोडले.दुसरीकडे संजदच्या नेत्यांनी मात्र हा व्हिडिओ फार जुना असल्याचा दावा केला आहे. साधुसंतांना भेटण्यात गैर काय? असाही सवाल त्यांनी केला. भाजपाचे नेते विनाकारण हा मुद्दा निवडणुकीत उचलून धरण्याचा प्रयत्न करीत असल्याचा त्यांचा आरोप होता.दरम्यान राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांना पत्रकारांनी या व्हिडिओसंदर्भात विचारले असता त्यांनी गमतीने घेत उत्तर देण्याचे टाळले व आपल्या शैलीत कुठल्याही तांत्रिकापेक्षा आपण सर्वात मोठे तांत्रिक आहोत, असे सांगितले. (वृत्तसंस्था) तांत्रिकाने विचारले लालूंशी हातमिळवणी का केली?या व्हिडिओतील आवाज अस्पष्ट असला तरी यात नितीशकुमार एका तांत्रिकासोबत खाटेवर बसलेले स्पष्ट दिसतात. त्यांच्यासमवेत संजदचे उमेदवार नीरजकुमार हे सुद्धा आहेत. नितीशकुमार आणि तांत्रिकातील बरेचसे संभाषण बरोबर ऐकू येत नसले तरी काही वेळेला तांत्रिक त्यांना आपण लालूप्रसाद यांच्यासोबत हातमिळवणी का केली? अशी विचारणा करीत असल्याचे स्पष्ट ऐकायला येते. एवढेच नाहीतर या तांत्रिकाने ‘नितीश जिंदाबाद, लालू मुर्दाबाद’ अशा घोषणाही दिल्या. नितीशकुमारांनी या तांत्रिकाचे आशीर्वाद आणि गळाभेटही घेतली, असे यात दिसून येते.