- एस.पी. सिन्हा, पाटणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दरबार कार्यक्रमात एका तरुणाने त्यांच्यावर चप्पल फेकली. ती चप्पल नितुशकुमार यांना लागली नाही. ती भलतीकडेच पडली. मात्र त्या तरुणाला पोलिसांनी लगेचच अटक केली. जनता दरबारात नितीशकुमार लोकांच्या तक्रारी एकून घेत असताना हा प्रकार घडल्यामुळे तिथे काही काळ गोंधळ उडाला. मात्र स्वत: नितीशगुमार यांनी लोकांना शांत केले आणि पुढे तो कार्यक्रम सुरू झाला.त्या पोलिसांला सोडून द्यावे, अशा सूचना नितुशकुमार यांनी पोलिसांना दिल्या. मात्र बराज वेळ पोलीस त्याची चौकशी करीत होते. चप्पल मारणाऱ्या तरुणाचे नावही नितीशच असून, तो आयटीआयचा विद्यार्थी असून, मूळ अरवल जिल्ह्याचा रहिवासी आहे. चप्पल मारणाऱ्या तरुणाचे नावही नितीशच आहे.