शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

जेडीयूमधील संघर्ष विकोपाला, शरद यादव यांच्या अपात्रतेसाठी नितीश सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 1:41 AM

संयुक्त जद(जेडी-यू) मधील अंतर्गत संघर्ष आता कटुत्वाच्या पातळीवर पोहोचला आहे. राज्यसभा सदस्य असलेल्या शरद यादव यांना सभागृहात अपात्र ठरविण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कंबर कसली आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली : संयुक्त जद(जेडी-यू) मधील अंतर्गत संघर्ष आता कटुत्वाच्या पातळीवर पोहोचला आहे. राज्यसभा सदस्य असलेल्या शरद यादव यांना सभागृहात अपात्र ठरविण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कंबर कसली आहे. हा मुद्दा निर्णयार्थ उपराष्टÑपती वेंकय्या नायडू यांच्याकडे गेला आहे.घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार चूक करणाºया सदस्यांना अपात्र ठरविले जात असले तरी शरद यादव यांना राज्यसभेत अपात्र ठरविणे सोपे नाही किंवा ते आपसूक घडणार नाही. उपराष्टÑपती नायडू हे राज्यसभेचे सभापती आहेत. केवळ अधिकृत जनता दलाने अर्ज दिल्याच्या आधारावर नायडूंना यादव यांना अपात्र ठरविता येणार नाही. त्यासाठी नायडूंकडे तीन पर्याय असतील. ते डॉ. करणसिंग यांच्या नेतृत्वातील राज्यसभेच्या आचार समितीकडे हे प्रकरण सोपवू शकतात. राज्यसभेच्या हक्कभंग समितीकडे सोपविण्याचा दुसरा किंवा स्वत:च्या न्यायाधिकार कक्षेत निर्णय घेण्याचा तिसरा पर्यायही अवलंबू शकतात. अपात्रता कारवाई चालविल्या जाणाºया व्यक्तीला बचावासाठी पुरेशी संधी द्यायला हवी, असे घटनातज्ज्ञ सुभाष कश्यप यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले आहे. दहाव्या परिशिष्टानुसार कोणत्याही सदस्याला आपसूक अपात्र ठरविण्याची तरतूद नाही. कश्यप हे लोकसभेचे सेक्रेटरी जनरल आहेत. पीठासीन अधिकाºयांच्या निर्णयाला आव्हान दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने पीठासीन अधिकाºयांचे निर्णय नाकारले आहेत, त्यामुळे पुरती खबरदारी आणि न्यायालयीन सल्ला घेण्याची गरज आहे. पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याबद्दल सभागृहाबाहेरील वर्तनाच्या आधारावर एखाद्याला अपात्र ठरविता येते, मात्र पक्षशिस्त मोडण्याचा भाग नेहमी वादाचा विषय राहिला आहे, असे कश्यप यांनी स्पष्ट केले. शरद यादव यांनी पक्षाचा आदेश धुडकावत लालूप्रसाद यादव यांच्या पाटण्यातील २७ आॅगस्टच्या रॅलीला हजेरी लावली हाच पक्षशिस्त मोडल्याचा एकमेव आधार ठरतो.राष्टÑीय परिषदेचा निर्णयच सर्वोच्च...पक्षाच्या राष्टÑीय परिषदेच्या निर्णयाचे उल्लंघन करण्याचा कुणालाही अधिकार नाही. भाजपविरोधात महाआघाडी स्थापन करण्याचा निर्णय या परिषदेनेच घेतला होता. शरद यादव हे अन्य कोणत्याही संघटनेचे नव्हे तर राष्टÑीय परिषदेच्या निर्णयाचे पालन करीत असल्याने त्यांना अपात्र ठरविण्याचा कोणताही आधार नाही, असे यादव यांच्या गटाचे सरचिटणीस जावेद रझा यांनी स्पष्ट केले.निवडणूक आयोगाची भूमिकाही महत्त्वाची...-हा मुद्दा याआधीच निवडणूक आयोगाकडे गेला आहे. शरद यादव यांनी मीच खºया जेडीयूचे प्रतिनिधित्व करीत असल्याचा दावा केला आहे. आयोगाने त्यांची याचिका दाखल करवून घेतली असली तरी नितीशकुमार यांना अद्याप नोटीस पाठविलेली नाही. सुनील अरोरा हे नवे निवडणूक आयुक्त बनल्यामुळे त्याबाबत हालचाली होऊ शकतात. यादव यांना तडकाफडकी अपात्र ठरविण्यासंबंधी लढाई आता उपराष्टÑपतींच्या दारी पोहोचल्याने उत्सुकता वाढली आहे. जेडीयूचे राज्यसभेतील नेते आर सी.पी. सिंग यांनी मात्र मला मीडियाशी काहीही बोलायचे नाही, असे सांगत सावध भूमिका अवलंबली आहे. मला काहीही माहिती नाही, असे सांगत जेडीयूचे प्रवक्ते के.सी. त्यागी यांनीही वक्तव्य टाळले आहे. शरद यादव यांनी दिलेल्या अर्जावर आयोग काय भूमिका घेते, याची आम्हाला प्रतीक्षा आहे, एवढेच त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार