यूपीच्या बहराइच जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नितीश तिवारीने कठीण दिवसांमध्ये हिंमत ठेवली, हार नाही मानली. आता यूपी पीसीएस 2022 च्या परीक्षेत 47 वा रँक मिळवून नितीश डीएसपी झाला आहे. नितीशचं सुरुवातीचं शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत झालं. बारावीपर्यंत केवी इंटर कॉलेजमध्ये शिकला. ग्रॅज्युएशन लखनौ विद्यापीठातून केलं. नितीशचे व़डील अरविंद तिवारी शेतकरी होते.
नितीशच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. वडिलांनी देखील शिक्षणात मोलाची साथ दिली. त्यांच्याकडे इतके पैसे आणि सुविधा नसल्याने ते मुलाला शिक्षणासाठी बाहेर पाठवू शकले नाहीत. पण मुलाच्या इच्छेसाठी त्यांनी सर्वकाही केलं. हिंमत एकवटून त्याला परदेशात शिक्षणासाठी पाठवले. या काळात अशीही वेळ आली की, मी माझ्या मुलाला म्हणालो, खासगी नोकरी कर, आता शिकवायची हिंमत नाही. पण मुलगा मेहनत करत राहिला असं वडिलांनी म्हटलं आहे.
डीएसपी म्हणून निवडून आलेल्या नितीशचा आत्मविश्वास आता पूर्वीपेक्षा वाढला आहे. या पदासाठी निवड झाल्यानंतरही त्याला आपला अभ्यास सुरू ठेवायचा आहे. ज्या दिवशी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने निकाल जाहीर केला, त्याच दिवशी नितीशचे वडील अरविंद तिवारी काही कामानिमित्त पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे बसण्यासाठी अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या पण त्याच्या वडिलांना बाहेर बसण्यास सांगितले. त्याचवेळी मुलगा नितीशने त्याला सांगितले की, तो डीएसपी झाला आहे.
वडिलांना खुर्चीवर बसू दिलं नाही आणि त्याच क्षणी मुलगा डीएसपी झाल्याची माहिती मिळाली. एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे दिसते. पण हे खरे आहे. नितीशचे स्वप्न आता आयएएस होण्याचे आहे. नितीशच्या धाकट्या भावालाही त्यांच्यासारखे अधिकारी व्हायचे आहे. एका हिदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"