शरद गुप्तानवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राष्ट्रीय राजकारणात प्रवेशासाठी भाजपच्या बिगर-यादव मागास जातींच्या मतपेटीला सुरुंग लावू इच्छितात. बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत भाजपचे याच मतपेढीच्या जोरावर गेल्या आठ वर्षांपासून चांगभलं सुरू आहे.
नितीश स्वत: ओबीसी समाजात मोडणाऱ्या कुर्मी समाजाचे असून, या समाजाचे बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड व उत्तर प्रदेशात यादवांनंतर सर्वाधिक प्रभुत्व आहे. या समाजाला गुजरातमध्ये पटेल, तर महाराष्ट्रात कुणबी संबोधतात. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल याच समुदायाचे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे याच समाजाचे आहेत. नितीश यांच्या समर्थकांनी यापूर्वी उत्तर प्रदेश व बिहारमध्ये कुर्मी महासंघाची स्थापना केेली. कुर्मींचा प्रभाव असलेल्या राज्यांत नितीश यांची रॅली आयोजित करण्याची योजना आहे.
भाजपने केली प्रत्युत्तराची तयारीभाजपने इतर मागास जातींना एकजूट करणे सुरू केले आहे. नितीश यांनी भाजपसोबतचे संबंध तोडल्यानंतर तातडीने भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ८ ते १० सप्टेंबर दरम्यान जोधपूर येथे घेण्यात आली. बैठकीच्या समारोपाला गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. यावरूनच या बैठकीचे महत्त्व लक्षात येते.
त्वरित उचलली पावलेभाजपने ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष लक्ष्मण यांना केवळ पक्षाच्या संसदीय मंडळात सामील केले नाही तर उत्तर प्रदेशातून राज्यसभेवरही पाठविले.