नवी दिल्ली : नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देताना शाळांनी आधारकार्डची सक्ती करू नये. तसे करणे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरेल, असा स्पष्ट इशारा ‘आधार’ कार्ड देणाऱ्या ‘युनिक आयडेंटिटी अॅथॉरिटी आॅफ इंडिया’ने ( यूआयडीएआय) दिला.दिल्लीसह अनेक शहरांमध्ये आगामी वर्षाच्या प्रवेशांसाठी पालकांना अर्ज देणे सुरु झाले आहे. हे अर्ज भरून देताना अनेक शाळा त्यासोबत प्रवेशेच्छुक पाल्याचे ‘आधार’कार्ड ही देण्याचा आग्रह धरत असल्याचे निदर्शनास आले.‘यूआयडीए’ चे मुख्यकार्यकारी अधिकारी अजय भूषणपांडे म्हणाले की, शाळा प्रवेशांसाठी ‘आधार’सक्ती करणे बेकायदा असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शाळा अशी सक्ती करू शकत नाहीत.