शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
3
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
4
Adani Group Stocks: आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स आजही गडगडले; 'या' कंपनीला सर्वाधिक फटका
5
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
6
सामान्यांना महागाईचा चटका! गॅस कंपनीकडून वाईट बातमी; CNG च्या दरात इतक्या रुपयांची भाववाढ
7
Baba Siddiqui : फोन इंटरनेटचा वापर न करता कसा रचला कट?; बाबा सिद्दिकी हत्येतील आरोपीचं रहस्य उघड
8
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
9
'महागाईविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही' डिसेंबरमध्ये EMI घटणार? RBI ने दिले संकेत
10
"सीआरपीएफचे जवान नसते तर...", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती
11
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
12
"आलियाला कपडे बदलायचे होते अन् क्रू मेंबर..." इम्तियाज अलीचा धक्कादायक खुलासा
13
Sensex-Nifty ग्रीन झोनमध्ये, बँक निफ्टी मजबूत; Adani Ent, Adani Port सह मेटल शेअर्स आपटले 
14
वडिलांनी खरेदी केलेल्या पहिल्या बाइकवर बसला भाईजान! बाप-लेकाचा फोटो पाहून चाहते म्हणतात- "स्वॅग असावा तर असा!"
15
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
16
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
17
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
18
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
19
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
20
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस

निवडणुकांत बाटली नको! रोख रक्कम, देशी तूप घ्या; जयहिंद सेनेचे प्रमुख नवीन यांचे वादग्रस्त विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 6:03 AM

चंडीगडमधील सेक्टर सहामधील उद्यानात आपल्या कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात त्यांनी ही विधाने केली.

बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : लोकसभा निवडणुकांमध्ये कोणाकडूनही रोख पैसे, देशी तूप भेट म्हणून घ्या; पण दारूची बाटली घेऊ नका. कारण निवडणुकांदरम्यान नकली किंवा महागड्या बाटल्यांतून स्वस्त किमतीचीही दारू दिली जाण्याची शक्यता असते. त्यापेक्षा रोख पैसे बिनदिक्कतपणे घ्या, असे वादग्रस्त विधान जयहिंद सेनेचे प्रमुख नवीन जयहिंद यांनी केले आहे. या वक्तव्याची सर्वत्र चर्चा आहे. 

चंडीगडमधील सेक्टर सहामधील उद्यानात आपल्या कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात त्यांनी ही विधाने केली. नवीन जयहिंद म्हणाले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकांत जातीपातीच्या आधारावर आपण मतदान करायचे नाही. निवडणुकांत उमेदवारांना त्यांनी केलेल्या कामांसंदर्भात मतदारांनी प्रश्न विचारले पाहिजेत. त्यासाठी लोकजागृती मोहिमेचे आयोजन करण्याकरिता त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची २८ एप्रिल रोजी बैठक बोलावली आहे. 

आम आदमी पक्षाचे हरयाणा प्रदेशाचे संयोजक म्हणून काम पाहिलेल्या नवीन जयहिंद यांनी याआधी लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला हाेता. लोकांना राजकीयदृष्ट्या जागृत करण्यासाठी त्यांनी जयहिंद सेनेची स्थापना केली.

टॅग्स :Punjabपंजाबchandivali-acचांदिवलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४