"पुढच्या वेळीही मी मुख्यमंत्री होईन, माझ्या पसंतीच्या मंत्र्यांचीही निवड करेन"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 09:27 PM2021-10-02T21:27:49+5:302021-10-02T21:28:32+5:30

Ashok Gehlot : भाजपाचे लोक बाहेर पडल्यामुळे काही लोकांना त्रास होऊ लागेल, असे म्हणत अशोक गहलोत यांनी भाजपाला टोला लगावला.

No Change Of Leadership, We Will Complete Our Tenure And Return Once Again: Ashok Gehlot | "पुढच्या वेळीही मी मुख्यमंत्री होईन, माझ्या पसंतीच्या मंत्र्यांचीही निवड करेन"

"पुढच्या वेळीही मी मुख्यमंत्री होईन, माझ्या पसंतीच्या मंत्र्यांचीही निवड करेन"

Next

जयपूर : पंजाब काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण झाल्याची परिस्थिती असताना आता राजस्थानमध्ये बंडखोरीचा सूर आहे. राजस्थानमध्येकाँग्रेसमध्ये अद्याप फारसा गदारोळ झाला नाही, परंतु अंतर्गत संबंधांमधील वाद स्पष्टपणे जाणवले जाऊ शकतात. अशातच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मोठं विधान केले आहे. पुढच्या वेळीही मुख्यमंत्री होणार असल्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत  यांनी स्पष्ट केले आहे. (No Change Of Leadership, We Will Complete Our Tenure And Return Once Again: Ashok Gehlot)

राजस्थानमध्ये पंजाबसारखे होणार नाही. मीडिया आणि भाजपा नक्कीच अशा कहाण्या चालवत आहेत, पण राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार पाच वर्षे चालणार आहे. पुढील 15 वर्षे देखील काँग्रेसचे सरकार कायम राहणार आहे, असे मीडियाशी बोलताना अशोक गहलोत यांनी म्हटले आहे. याचबरोबर, भाजपाचे लोक म्हणतात की, मुख्यमंत्री घरात बसतात. मात्र, मी तर हॉटेलमध्ये जैसलमेर-जयपूर फिरत होतो. ही अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांची कृपा होती, असे अशोक गहलोत म्हणाले.

याचबरोबर, भाजपाचे लोक बाहेर पडल्यामुळे काही लोकांना त्रास होऊ लागेल, असे म्हणत अशोक गहलोत यांनी भाजपाला टोला लगावला. मला काहीही होणार नाही, आता 15 वर्षे राहणार. मी घरात बसलो नाही, जर मी निघून गेलो तर तुम्हाला आणि तुमच्या चाहत्यांनाही समस्यांना सामोरे जावे लागेल, असे अशोक गहलोत म्हणाले. दरम्यान, अशोक गेहलोत यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून घराबाहेर पडत नसल्याचा आरोप करण्यात येत होता. या आरोपावर उत्तर देताना अशोक गहलोत यांनी हे स्पष्टीकरण दिले.

याशिवाय, अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावरही निशाणा साधला. मी माझ्या आवडीचे मंत्री बनवेन आणि पुढच्या वेळी सुद्धा मी मुख्यमंत्री होईन, असे अशोक गहलोत यांनी म्हटले आहे. दरम्यान, अशोक गहलोत यांचे हे विधान एकप्रकारे सचिन पायलट यांना आव्हान देणारे आहे, कारण त्यांना आपल्या समर्थकांना दीर्घकाळ मंत्रिमंडळात सामावून घ्यायचे आहे.

Web Title: No Change Of Leadership, We Will Complete Our Tenure And Return Once Again: Ashok Gehlot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.