No Confidence Motion: भूकंपासाठी तयार राहा; भाजपाकडून राहुल गांधींची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 01:04 PM2018-07-20T13:04:09+5:302018-07-20T13:04:58+5:30
लोकसभेत आज टीडीपीने ठेवलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असून नेत्यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे. या प्रस्ताववर मतदान न करण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
नवी दिल्ली - लोकसभेत आज टीडीपीने ठेवलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असून नेत्यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे. या प्रस्ताववर मतदान न करण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. तर राहुल गांधींच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ट्विटरवर #BhookampAaneWalaHai हा हॅशटॅग टॉप दोनवर ट्रेंड करत आहे. तर #NoConfidenceMotion हा हॅशटॅग टॉप वन आहे. भूंकप आने वाला है, या टॅगलाईनने ट्विटवर राहुल गांधींची खिल्ली उडवली जात आहे.
संसदेत मला बोलायची केवळ 15 मिनिटे बोलायची संधी दिली, तर भूकंप येईल, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केले होते. राहुल गांधींच्या या स्टेटमेंटवरुन भाजप नेत्यांकडून आज त्यांची खिल्ली उडविण्यात येत आहे. भाजप नेते गिरिराज सिंह यांनी 'भूंकपाची मज्जा घेण्यासाठी तयार राहा' असे ट्विट करत राहुल गांधींना चिमटा घेतला आहे.
भूकंप के मज़े लेने के लिए तैयार हो जाइए ।
— Giriraj Singh (@girirajsinghbjp) July 20, 2018
भाजप खासदार परेश रावल यांनीही राहुल गांधींनी आज 15 मिनिटे न चुकता भाषण केले, तर धरणी हालेल, हाललेच काय तर नाचेल असे म्हणत राहुल यांची खिल्ली उडवली आहे. त्यानंतर ट्विटवर #BhookampAaneWalaHai हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. तर सोशल मीडियावरुन राहुल गांधींची खिल्ली उडविण्यात येत आहे. तसेच राहुल गांधी आज संसदेत काय भाषण करणार ? राहुल गांधी 15 मिनिटे बोलणार का ? याबाबत नेटीझन्स ट्विटरवर चर्चा करत आहेत.
Agar aaj Rahul ji bina padhe, bina fumble kare, bina ghalti kare 15 minute bolenge toh dharti zaroor hilegi, hilegi bhi kya, naachegi: Paresh Rawal,BJP MP #NoConfidenceMotionpic.twitter.com/EwGCtOlxRe
— ANI (@ANI) July 20, 2018