नवी दिल्ली - लोकसभेत आज टीडीपीने ठेवलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असून नेत्यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे. या प्रस्ताववर मतदान न करण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. तर राहुल गांधींच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ट्विटरवर #BhookampAaneWalaHai हा हॅशटॅग टॉप दोनवर ट्रेंड करत आहे. तर #NoConfidenceMotion हा हॅशटॅग टॉप वन आहे. भूंकप आने वाला है, या टॅगलाईनने ट्विटवर राहुल गांधींची खिल्ली उडवली जात आहे.
संसदेत मला बोलायची केवळ 15 मिनिटे बोलायची संधी दिली, तर भूकंप येईल, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केले होते. राहुल गांधींच्या या स्टेटमेंटवरुन भाजप नेत्यांकडून आज त्यांची खिल्ली उडविण्यात येत आहे. भाजप नेते गिरिराज सिंह यांनी 'भूंकपाची मज्जा घेण्यासाठी तयार राहा' असे ट्विट करत राहुल गांधींना चिमटा घेतला आहे.