No Confidence Motion : अविश्वास ठरावावरील चर्चेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 07:54 AM2018-07-20T07:54:20+5:302018-07-20T09:04:14+5:30
मोदी सरकारविरोधात तेलगू देसम व काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे.
नवी दिल्ली - मोदी सरकारविरोधात तेलगू देसम व काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर शुक्रवारी लोकसभेत चर्चा होणार आहे. या ठरावाच्या निमित्ताने विरोधी पक्ष सरकारवर जोरदार तुटून पडतील. सरकारचे अपयश देशापुढे मांडण्याचे काम आम्ही करू, असे काँग्रेसने म्हटले आहे. मोदी सरकारवरील हा पहिलाच अविश्वास ठराव आहे.
दरम्यान, या अविश्वास ठरावावरील चर्चेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. ''संसदीय लोकशाहीसाठी आजचा महत्त्वाचा दिवस आहे. सखोल आणि अडथळ्याविना चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे'', असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. संपूर्ण देश आज आपल्याला जवळून पाहत आहे, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
(No Confidence Motion : अविश्वास ठरावावर शिवसेनेचं अद्यापही तळ्यात-मळ्यात)
Today is an important day in our Parliamentary democracy. I am sure my fellow MP colleagues will rise to the occasion and ensure a constructive, comprehensive & disruption free debate. We owe this to the people & the makers of our Constitution. India will be watching us closely.
— Narendra Modi (@narendramodi) July 20, 2018
दरम्यान, सरकारच्या चार वर्षांतील कामगिरीचे कौतुक भाजपा व मित्रपक्ष चर्चेमध्ये निश्चितच करतील. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही भाषण करतील आणि ते अतिशय आक्रमक व विरोधकांवर हल्ला चढविणारे असू शकेल. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्याने विरोधक व सरकार पक्ष यांना या ठरावाच्या निमित्ताने जोरदार आरोप-प्रत्यारोप होतील, हे उघड आहे.
या ठरावावरील चर्चेच्या वेळी आपल्या सदस्यांनी उपस्थित राहावे, यासाठी काँग्रेस, भाजपा, तेलगू देसम, अण्णा द्रमुक, बिजू जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, राजद यांसह जवळपास सर्वांनी व्हिप (पक्षादेश) जारी केला आहे. शिवसेनेने मात्र ‘व्हिप’ सायंकाळी उशिरा मागे घेतला. आता ठाकरे शुक्रवारी भूमिका स्पष्ट करतील. शिवसेना कदाचित हजर राहून मतदान न करण्याचा किंवा मतदानाला गैरहजर राहण्याचा निर्णयही घेईल.
कोण बाजूने, कोण विरोधात?
ठरावाला शिवसेना व अण्णा द्रमुक हे पक्ष पाठिंबा देणार नाहीत, तर तेलंगणा राष्ट्र समितीही या ठरावाला पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. बिजू जनता दलाने आपली भूमिका उद्या जाहीर करण्याचे ठरविले आहे. हे दोन्ही पक्ष कदाचित मतदानात भागच घेणार नाहीत, असे सांगण्यात येते आहे.
Discussions will start at 11 am today. Nation is concerned about the stand of Shiv Sena. Our party will make the right decision. Between 10:30 -11:00 am, party chief will himself tell the party about his decision: Sanjay Raut, Shiv Sena. #NoConfidenceMotionpic.twitter.com/ykh4D2PN19
— ANI (@ANI) July 20, 2018
Chandrakant Khaire, Shiv Sena Chief whip in Lok Sabha to ANI says that there was no whip issued to vote one way or another. Notice has been given to be present in Parliament. Party chief Uddhav Thackeray will take final decision. #NoConfidenceMotionpic.twitter.com/ozDr0EtLlT
— ANI (@ANI) July 19, 2018
चर्चेला कोणाला किती वेळ?
भाजपा : ३.३३ तास
काँग्रेस : ३८ मिनिटे
अद्रमुक : २९ मिनिटे
तृणमूल : २७ मिनिटे
बीजेडी : १५ मिनिटे
शिवसेना : १४ मिनिटे
तेलगू देसम : १३ मिनिटे
टीआरएस : ९ मिनिटे
माकप : ७ मिनिटे
सपा : ६ मिनिटे
राष्ट्रवादी : ६ मिनिटे
लोजपा : ५ मिनिटे