नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात तेलगू देसम आणि काँग्रेसने मांडलेला अविश्वास ठराव फेटाळून लावला आहे. मोदी सरकारकडे लोकसभेत आवश्यक संख्याबळ असल्याने हा अविश्वास प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. मात्र या ठरावादरम्यान काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीका केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी गेल्या चार वर्षातील सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा लोकसभेत मांडण्यात आला. अखेर हा अविश्वास प्रस्ताव 325 सदस्यांच्या बहुमताच्या जोरावर फेटाळण्यात आला आहे.
अविश्वास प्रस्तावाच्या बाजूनं फक्त 126 मतं, तर विरोधात पडली 325 मतं भाजपा खासदार के. सी. पटेल आणि भोला सिंग मतदानादरम्यान लोकसभेत झाले हजरमतदानापूर्वीच खासदार पप्पू यादव यांनी केलं वॉकआऊटमोदींचं भाषण सुरू होतं असं वाटत होतं की मी एक बॉलिवूड ब्लॉकबस्टर सिनेमा पाहत होतो, त्यांचं भाषण ऐकून त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार द्यावा- श्रीनिवास केसिनेन, टीडीपी खासदार
मॉब लिंचिंगविरोधात राज्य सरकारला आदेश देण्यात आले आहेत - नरेंद्र मोदी
स्वच्छता, मुलीच्या सुरक्षेसाठी नवे धोरण आखले - नरेंद्र मोदी
कर्जबुडव्यांविरोधात केंद्र सरकारची मोठी कारवाई - नरेंद्र मोदी
ग्रामविकासासाठी अनेक पावले उचलली - नरेंद्र मोदी
यूपीएच्या काळात बँकिंग व्यवस्था खिळखिळी झाली - नरेंद्र मोदी
काँग्रेस सत्तेत असेपर्यंत बँकांना लुटण्याचं काम सुरु होतं - नरेंद्र मोदी
वुई वान्ट जस्टीस, पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांची पुन्हा घोषणाबाजी...
आज संपूर्ण देश टीव्हीवर पाहत आहे, डोळ्यांचा खेळ. कशी डोळ्याची उघड-झाप करण्यात येत आहे - नरेंद्र मोदी
मी चौकीदार, भागीदारही आहे; तुमच्यासारखा सौदागर नाही - नरेंद्र मोदी
शरद पवारांनी तुमच्या डोळ्यात डोळे टाकले तर काय केलं त्यांच्यासोबत ?- नरेंद्र मोदी
विरोधकांकडून सत्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न होतोय - नरेंद्र मोदी
आरक्षण संपेल, दलितांचं रक्षण करणारे कायदे संपतील, अशा अफवा पसरवल्या जात आहेत - नरेंद्र मोदी
मी गरीब, मागास जातीत जन्मलेला मुलगा आहे, तुमच्या नजरेला नजर भिडवून कसं बोलणार? - नरेंद्र मोदी
तुम्हाला एवढी ताकद मिळावी की 2024 मध्ये तुम्ही पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणावा - नरेंद्र मोदी
काँग्रेसला स्वत:वरच अविश्वास आहे आणि अविश्वासच त्यांची कार्यशैली आहे - नरेंद्र मोदी
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 90 हजार कोटी रुपये वाचवले - नरेंद्र मोदी
बेहिशेबी मालमत्तेचं विधेयक 20 वर्षे मंजूर केलं गेलं नाही, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होता? नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदींनी जनधन, गॅस सिलेंडर सबसिडीचा केला उल्लेख, विरोधकांकडून घोषणाबाजी सुरूच
कुठल्याही राजकारणाविना आम्ही 'सबका साथ, सबका विकास' मंत्रानुसार काम करतोय - नरेंद्र मोदी
32 कोटी जनधन खाते उघडण्याचं काम आमच्या सरकारने केले - नरेंद्र मोदी
18 हजार गावांमध्ये वीज पोहोचवली - नरेंद्र मोदी
आम्हाला सव्वाशे कोटी देशावासियांचे आशीर्वाद आहेत - नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान तेलगू देसम खासदारांचा गोंधळ..
सरकार पाडण्यासाठी इतका उतावळेपणा का?- नरेंद्र मोदी
या ठिकाणी मोदी हटवा, हा एकच मुद्दा आहे - नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल...
आपण सर्व अविश्वास प्रस्ताव रद्द करावा - नरेंद्र मोदी
देशाने विरोधकांनी नकारत्मकता पाहिली - नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात...
राजू शेट्टी यांनी सुद्धा मोदीसरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.
कोरियाचा हुकुमशाह आणि अमेरिकेचे अध्यक्ष भेटून चर्चेतून तोडगा काढतात, मग भारत-पाकिस्तानमध्ये तसे का होत नाही? - फारुख अब्दुल्ला
मुस्लिमांवर संशय घेऊ नका - फारुख अब्दुल्ला
मुसलमान सुद्धा देश भक्त असतो - फारुख अब्दुल्ला
कोणताही प्रश्न विचारल्यावर उत्तर एकच मिळते. हिंदू-मुस्लिम - दिनेश त्रिवेदी.
गेली चार वर्षे 'अच्छे दिन'ची वाट बघतोय - दिनेश त्रिवेदी
लोकसभेत दिनेश त्रिवेदी यांच्या भाषणाला सुरुवात...
- तेलगू देसमने मांडलेल्या अविश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा देताना काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली. खर्गे यांनी हे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांवर चालत आहे असा थेट आरोप करत खर्गे यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली आहे. हे सरकार सभागृहात काही लोकांना बाहेर जाण्यास सांगते, काही लोकांना अनुपस्थित राहाण्यास सांगते. फोडा आणि राज्य करा अशा पद्धतीने हे सरकार कामकाज करते असा थेट आरोप खर्गे यांनी पंतप्रधान आणि सरकारवर केला.
महिला आरक्षण विधेयकावरून रामविलास पासवानच्या भाषणादरम्यान गदारोळ.
पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा अनेकवेळा पराभव झाला आहे - तारिक अन्वर
हे सरकार अच्छे दिनाच्या घोषणा करत सत्तेत आले. लोकांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताचे चित्र बदलेल असे वाटले होते - तारिक अन्वर
सबका साथ सबका विकास या त्यांच्या घोषणेची आज समिक्षा केल्यास सबका साथही नाही आणि सबका विकासही नाही असे दिसत आहे - तारिक अन्वर
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तारिक अन्वर यांनी लोकसभेत केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करणारे भाषण केले.
- राहुल गांधी यांनी लोकसभेत चिपको आंदोलन सुरु केले - राजनाथ सिंह
- कमकुवत विरोधक भाजपविरोधात एकवटले - राजनाथ सिंह
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरात देशाचा मान वाढवला आहे - राजनाथ सिंह
- 15 वर्षांनंतर केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला आहे. आम्हीही काँग्रेसच्या दहा वर्षांच्या काळात अविश्वास प्रस्ताव आणला नाही. कारण त्या सरकारकडे जनतेचा पाठिंबा होता, याची आम्हाला जाणीव होती. आमचा त्या बहुमतावर विश्वास होता - राजनाथ सिंह
- लोकसभेत राजनाथ सिंह यांच्या भाषणास सुरुवात
- सीपीआयएम खासदार मोहम्मद सलीम यांची भाजपा सरकारवर जोरदार टीका
- मंत्र्यांवरील खोट्या आरोपांबाबत राहुल गांधींविरोधात भाजपा आणणार विशेषाधिकार हननाचा प्रस्ताव
- अमेरिकेत शेतक-यांना प्राधान्य दिले जाते - मुलायम सिंह यादव
- आज शेतकरी, तरुण आणि व्यापारी वर्ग संतप्त आहे - मुलायम सिंह यादव
- देशातील तरुण बेरोजगार राहिले तर देश संपन्न होणार नाही - मुलायम सिंह यादव
- भाजपाच्या राज्यात भाजपाचेच लोक दु:खी - मुलायम सिंह यादव
- भाजपा सरकारच्या काळात व्यापारी आणि शेतकरी त्रस्त, बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही - मुलायम सिंह यादव
- लोकसभेत मुलायम सिंह यादव यांच्या भाषणास सुरुवात
- अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 6.30 वाजता भाषण देण्याची शक्यता
- राहुल गांधी 2019 मध्ये आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देणार असतील तर तेलंगणालाही करांमध्ये सूट देणार आहेत का, टीआरएस खासदारांची विचारणा
- 2019 मध्ये भाजपाचा पराभव होईल - शोगाता रॉय, खासदार, तृणमूल काँग्रेस
- महिलांचे संरक्षण, मॉब लिचिंगसारख्या प्रश्नांवर लक्ष देण्याची गरज - पी. वेणुगोपाल
- केंद्र सरकारने योजनांचा थकीत निधी जारी करावा - पी. वेणुगोपाल, एआयडीएमके
- भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये गुप्ततेचा करार 25 जानेवारी 2008 साली काँग्रेसचे मंत्री ए. के. अँटनी यांनीच केला होता. असे सांगत निर्मला सीतारामन यांनी फ्रान्सबरोबर झालेल्या कराराची प्रत दाखवत ए. के. अँटनी यांची स्वाक्षरीही दाखविली. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी एका भारतीय माध्यमाला मुलाखत देताना कराराची माहिती देता येणार नसल्याचा दाखलाही त्यांनी दिला.
- राफेल कराराबाबत केलेल्या आरोपांना निर्मला सीतारामन यांनी दिले प्रत्युत्तर
- ही संसद आहे, मुन्नाभाईसारखी जादू की झप्पी घेण्याची जागा नाही - हसरिमत कौर
- राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आलिंगन
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष वेगळ्या पद्धतीचे राजकारणी आहेत, ते सत्ता गमावू इच्छित नाही - राहुल गांधी
- देशात गरीब, दलित, आदिवासींवर अत्याचार सुरू असताना पंतप्रधान एक शब्द बोलत नाहीत, सरकारमधील मंत्री आरोपींच्या गळ्यात हार घालतात - राहुल गांधी
- राहुल गांधीचे भाषण सुरू
शेतमालाला हमीभाव हासुद्धा मोदी सरकारचा जुमला स्ट्राइक असल्याचा केला आरोप
- गोंधळानंतर लोकसभेच्या कामकाजास पुन्हा सुरुवात
गोंधळावरून लोकसभा अध्यक्षांनी सदस्यांना सुनावले खडेबोल
- राहुल गांधींच्या आरोपांमुळे सत्ताधाऱ्यांचा तीळपापड,गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब
- पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या नजरेत नजर मिळवू शकत नाहीत - राहुल गांधी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या पंतप्रधानांसोबत झोपाळ्यावर झोके घेत असताना चिनी सैनिकांनी भारताच्या क्षेत्रात घुसखोरी केली होती - राहुल गांधी
- राफेल विमान करारावरून राहुल गांधींचे मोदी सरकार आणि संरक्षण मंत्र्यांवर जोरदार आरोप
- राहुल गांधींच्या भाषणादरम्यान लोकसभेत जोरदार गोंधळ
- चीन 24 ताासात 50 हजार लोकांना रोजगार देते, तुम्ही 24 तासांत 400 लोकांना रोजगार देऊन दाखवा, राहुल गांधींचे आव्हान
- जुमला स्ट्राइक हे भाजपाचे राजकीय अस्र
- भाषणाच्या सुरुवातीलाच राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्ला
- अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणास सुरुवात
- निराशा आणि हताशेतून विरोधकांनी मांडला अविश्वास प्रस्ताव - राकेश सिंह
- राकेश सिंह यांच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ
- मोदी सरकारने पूर्वोत्तर राज्यातील जनतेला मुख्य प्रवाहात आणले - राकेश सिंह
- राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोदी सरकारने केलेल्या योजनांचा राकेश सिंह यांनी केला उल्लेख
- राकेश सिंह यांनी वाचली मोदी सरकारने गेल्या चार वर्षांत राबवलेल्या योजनांची यादी
जनधन योजना, शेतकरी विमा, रस्तेबांधणी, विद्युतीकरण, स्वच्छ भारत, शौचालयांची बांधणी यांचा केला उल्लेख
- कुठल्याही एका राज्याच्या मागण्यांसाठी संपूर्ण देशाच्या हितांचे बलिदान देता येणार नाही - राकेश सिंह, भाजपा खासदार
- मनमोहन सिंग म्हणाले होते की देशातील संपत्तीवर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा आहे, तर मोदींनी देशातील संपत्तीवर पहिला हक्क गरिबांचा असल्याचे म्हटले आहे.
- गल्ला जी तुम्ही म्हणताहात की मी शाप देतोय, तुम्ही तर काँग्रेससोबत गेलात तेव्हाच शापित झाला आहात - राकेश सिंह
- गल्ला यांचे भाषण ऐकल्यावर वाटले की अविश्वास प्रस्तावाची गरज नव्हती - राकेश सिंह
- अविश्वास प्रस्तावाला काँग्रेस आणि द्रमुकने पाठिंबा दिला आहेत. त्यामुळे त्याचे समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही - व्ही. मैत्रेयन, एआयएडीएमके खासदार
- भाजपा खासदार राकेश सिंह यांच्या भाषणास सुरुवात
- लोकसभेत तेलुगू देसमच्या खासदारांनी पंतप्रधानांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह केलेल्या टिप्पणीविरोधीत भाजपा सदस्यांचा लोकसभेत गोंधळ
- जनता दल युनायटेड अविश्वास प्रस्तावादरम्यान देणार सरकारला साथ - नितीश कुमार
- संसदेच्या आजच्या कामकाजावर शिवसेनेचे खासदार बहिष्कार घालणार आहेत - आनंदराव अडसूळ
- आंध्र प्रदेशची जनता फसवली गेली आहे. पंतप्रधान आंध्रच्या जनतेचा असा विश्वासघात कसा काय करू शकतात ? येत्या निवडणुकीत आंध्र प्रदेशमधील जनता याला चोख प्रत्युत्तर देईल, ही धमकी नाही आमचा शाप आहे - जयदेव गल्ला
- काँग्रेस आणि भाजपा दोघांमुळेही आंध्र प्रदेशची अवस्था बिकट झाली आहे - जयदेव गल्ला
- जयदेव गाला यांच्या भाषणादरम्यान लोकसभेत गोंधळ
- मोदी सरकारने आंध्र प्रदेशची फसवणूक केली, मोदी सरकारमुळे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत - जयदेव गल्ला
- तेलुगू देसमचे खासदार जयदेव गल्ला यांनी केली अविश्वास प्रस्तावावरील चर्चेस सुरुवात
- अविश्वास प्रस्तावावर संध्याकाळी 6 वाजता होणार मतदान
- ओदिशावर अन्याय झाल्याचा आरोप करत बीजू जनता दलाचा लोकसभेतून सभात्याग
- अविश्वास प्रस्तावावरील चर्चेसाठी लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला विरोधी पक्षांना मिळालेल्या कमी वेळेचा मुद्दा
- अविश्वास प्रस्तावावरील चर्चेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पक्षाध्यक्ष अमित शाह आणि राजनाथ सिह यांच्यासह पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक
- अविश्वास प्रस्तावादरम्यान शिवसेना घेणार तटस्थ भूमिका, शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली माहिती
शिवसेना सरकारसोबत राहणार, पण लोकसभेत मतदान नाही करणार
- अविश्वास प्रस्तावावरील चर्चेसाठी कमी वेळ मिळाल्याने काँग्रेसची नाराजी. केंद्र सरकारचे अपयश आणि 130 कोटी जनतेच्या समस्या अधोरेखीत करण्यासाठी हीच योग्य वेळ. त्यासाठी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेसाठी प्रत्येक पक्षाला किमान 30 मिनिटांचा वेळ मिळायला हवा होता. सर्वात मोठ्या विरोधी पक्षास केवळ 38 मिनिटांचा वेळ मिळणे चुकीचे - मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते
- आपल्या भाषणाने भूकंप येईल, असे राहुल गांधी म्हटले होते. त्यानुसार भूकंप नक्कीच येईल, पण तो काँग्रेस पक्षात येईल आणि एनडीएला अपेक्षेपेक्षा अधिक पाठिंबा मिळेल. - अनंत कुमार, भाजपा नेते
- अविश्वास प्रस्तावावरील चर्चेस सुरुवात होण्यापूर्वी शिवसेनेच्या संसदीय मंडळाची बैठक सुरू, अविश्वास प्रस्तावाबाबतच्या भूमिकेबाबत होणार अंतिम निर्णय
- अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचे संसदेत आगमन
- अविश्वास प्रस्तावादरम्यान शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत मांडणार पक्षाची भूमिका
- अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राजनाथ सिंह, राकेश सिंह, वीरेंद्र सिंह मस्त आणि अर्जुन राम मेघवाल मांडणार सरकारची बाजू
- अविश्वास प्रस्तावादरम्यान खासदारांनी लोकसभेत विधायक, व्यापक आणि व्यत्यय-मुक्त चर्चा करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.
चर्चेला कोणाला किती वेळ?भाजपा : ३.३३ तासकाँग्रेस : ३८ मिनिटेअद्रमुक : २९ मिनिटेतृणमूल : २७ मिनिटेबीजेडी : १५ मिनिटेशिवसेना : १४ मिनिटेतेलगू देसम : १३ मिनिटेटीआरएस : ९ मिनिटेमाकप : ७ मिनिटेसपा : ६ मिनिटेराष्ट्रवादी : ६ मिनिटेलोजपा : ५ मिनिटे