नवी दिल्ली : रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने देशातील सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारकडून राखी आणि गणेश मूर्तींना जीएसटीतून वगळण्यात आले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी दिली. अर्थमंत्री पियूष गोयल यांनी नवी दिल्लीमध्ये आज याची घोषणा केली. ते म्हणाले 'राखी, गणेश मूर्ती, हस्तशिल्प, हातमागाच्या वस्तू आदींना जीएसटीमधून वगळले आहे. गणेशोत्सव आणि रक्षाबंधनच्या काळात लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. दरम्यान, रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या संबंधित वस्तूंना जीएसटीतून वगळण्यात आल्याने जनेताला मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 26 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. तर 13 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सॅनिटरी नॅपकिनलाही जीएसटीतून वगळण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. सॅनिटरी नॅपकिनवर 12 टक्के जीएसटी आकारण्यात आला होता.