नवी दिल्ली : लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याबाबत राष्ट्रीय स्तरावर सहमती न झाल्यास त्या लोकांवर थोपवल्या जाऊ नयेत, असे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी म्हटले आहे. एक उच्चस्तरीय समिती देशात एकत्रित निवडणूक घेण्याच्या शक्यतांचा शोध घेत असताना कुरेशी यांनी हे मत व्यक्त केले.
‘इंडियाज एक्सपेरिमेंट विथ डेमोक्रसी : द लाइफ ऑफ अ नेशन थ्रू इट्स इलेक्शन्स’ या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर ते बोलत होते. विद्यमान निवडणूक आयुक्त ठाम राहतील व आगामी निवडणुकांत आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करतील, अशी आशाही कुरेशी यांनी व्यक्त केली. दरम्यान, निवडणूक रोख्यांच्या वापरावरही यावेळी त्यांनी आक्षेप घेतला.