- सुमेध बनसोड/विनोद गोळेनवी दिल्ली : अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस ‘नो लोकपाल, नो मोदी’च्या गगनभेदी घोषणांनी गाजला. रामलीला मैदानावर कालचाच जोश आजही होता. हजारो शेतकरी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते. डॉक्टरांच्या पथकाने दुपारी अण्णांची प्रकृती तपासली. उपोषणामुळे अण्णांचे वजन घटले असून, रक्तदाबही वाढला आहे. तरीही उपोषणावर अण्णा ठाम आहेत.आजचा दिवस विशेष लक्षणीय ठरला ‘नो लोकपाल, नो मोदी’ या घोषणाबाजीने. शेतकऱ्यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, लोकपाल नियुक्त करा, या मागण्या केल्या. व्यासपीठावरून देशभक्तीपर गीते सुरू होती. वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या शेतकरी नेत्यांच्या भाषणांनी आंदोलकांचा उत्साह वाढत होता. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करणाºया शेतकºयांची संख्या यंदा लक्षणीय आहे.अण्णा सकाळी व्यासपीठावर आले. प्रार्थनेने दुसरा दिवस सुरू झाला. त्यानंतर ‘नो लोकपाल, नो मोदी’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘जय जवान, जय किसान’, ‘अण्णाजी आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणा सुरू झाल्या. गेल्या आंदोलनाच्या तुलनेत यंदा गर्दी क मी असली तरी, अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त दिसत होता. मैदानात एका बाजूला जेवणाची व्यवस्था होती.पंजाब, हरयाणातून येणाºया शेतकºयांची संख्या मोठी असली तरी त्यांच्या बसेस अडवण्यात येत आहेत. आंदोलन चिरडण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे, अशी टीका अण्णांनी केली.आंदोलन हा लोकशाहीतील अधिकार आहे. जनतेला न्याय मिळत नाही, तेव्हा आंदोलन होते. अहिंसक मार्गाने असलेले हे आंदोलन कुठलाही पक्ष, वा व्यक्तीच्या विरोधात नाही, देशाच्या भल्यासाठी आहे. सरकारशी बोलणी सुरू आहेत. सरकार आज काही कागदपत्रे पाठवणार आहे. त्यांचा अभ्यास करून, पुढची दिशा ठरवू. मागण्या मान्य करायला सरकार तयार असेल तर आम्हाला आंदोलन करण्यात आनंद नाही, असे अण्णा म्हणाले.राजनाथ यांच्याशी चर्चेची शक्यताअण्णांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकार हादरले असून, हजारे यांच्याबरोबर केंद्रीय कृषी राज्यमंत्री शेखावत यांनी बुधवारी चर्चा केली होती. कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्याशी मोबाइलवर संभाषण झाले होते. सरकारने लेखी आश्वासन द्यावे, असे अण्णांनी सुचवले. अण्णांच्या प्रकृतीचा विचार करून गृहमंत्री राजनाथ सिंह त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते.दिल्लीकरांची पाठ? अण्णा हजारेंनी २0१२ मध्ये पुकारलेल्या जनलोकपाल आंदोलनात दिल्लीकरांनी खूप गर्दी केली होती. यंदा मात्र दिल्लीकरांनी येथे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. सुमारे दोन हजार आंदोलक शनिवारी उपस्थित होते. आंदोलकांची संख्या वाढेल, असा विश्वास टीम अण्णाच्या सदस्यांनी व्यक्त केला.
‘नो लोकपाल, नो मोदी’, रामलीला दुमदुमले; अण्णांच्या प्रकृतीत बिघाड, उपोषण मात्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 5:44 AM