- नितीन अग्रवालनवी दिल्ली : कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी दोन वेगवेगळ्या लसींचे डोस द्यावेत की नाही, यावर तर्क-वितर्क केले जात असताना सरकारने स्पष्ट केले की, लसीकरण कार्यक्रमाच्या नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तेव्हा लोकांनी एकाच लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे.नीती आयोगाचे सदस्य आणि राष्ट्रीय कोविड कृती गटाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेेतल्यास अनेकांना आरोग्यसंबंधीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन वेगवेगळ्या लसी घेतल्यास चांगली प्रतिकार शक्ती निर्माण होते? या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी अद्याप चाचणी होणे बाकी आहे. यासंदर्भात अनेक देशांत अभ्यास केला जात आहे. लसीचे दोन डोस आवश्यक...कोविशिल्डच्या एकाच डोससंबंधी चाललेल्या चर्चेबाबत डॉ. पॉल म्हणाले की, सध्या तरी या लसीचे दोन डोस निर्धारित करण्यात आले आहेत. दोन डोस आवश्यक आहेत. या आधारावर लसीकरण कार्यक्रम राबविला जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्ग होण्याच्या शक्यतेवर डॉ. पाल म्हणाले की, आतापर्यंत २ ते ३ टक्के मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. विषाणूत परिवर्तन झाल्यास ही स्थिती बदलू शकते. तज्ज्ञांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारच्या स्थितीचा मुकाबला करण्याची तयारी सुरू केली. संसर्गित मुलांवर योग्य उपचार करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था केली जाईल. कोरोनामुळे मुलांमध्ये मल्टिसिस्टीम इंफ्लेमेट्रीची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी आरोग्य कर्मचारी तयार करण्यात आले आहेत.रामदेव बाबांच्या वक्तव्यांविरुद्ध डॉक्टरांचा काळा दिवस ॲलोपॅथीसंबंधी रामदेव बाबा यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ दिल्लीतील अनेक हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरांनी मंगळवारी काळा वस पाळत निदर्शने केली. त्यांनी अशी मागणी केली आहे की, एकतर रामदेव बाबा यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरुद्ध साथरोग नियमांतर्गत कारवाई केली जावी. दिल्लीतील निवासी डॉक्टरांनी काळ्या पट्ट्या आणि रिबिन बांधून निदर्शने केली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रामदेव बाबा यांच्या विरोधात आमची निदर्शने सकाळी सुरू झाली. रामदेव बाबा यांच्या विधानाने डॉक्टरांचे मनोबल खचत आहे. साथरोगाविरुद्ध आम्ही दिवसरात्र लढत आहोत. फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने मंगळवारी आपल्या ट्विटर प्रोफाइलवरून फोटो बदलून त्यावर काळे पोस्टर लावले आहे. यावर काळा दिवस असे लिहिले आहे.
CoronaVirus News: वेगवेगळ्या कोरोना लसींचे दोन डोस घेतले तर...; सरकारनं सांगितला पुढचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 6:20 AM