अशोकनगर: मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है, डिजिटल इंडिया अशा घोषणा सरकारकडून करण्यात येतात. त्यासाठीच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती होतात. पण या घोषणा प्रत्यक्षात जमिनीपर्यंत पोहोचतात का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. सरकारच्या अनेक घोषणा, सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. कधी कधी याचा फटका नेते मंडळींना बसतो. मध्य प्रदेशमधील एका मंत्र्यांना याचा अनुभव येत आहे. (MP Minister Sits In A 50 Feet High Swing for mobile network)झूम मिटींग सुरू असतानाच बायको किस करायला आली; अन् व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा म्हणाले.....मध्य प्रदेशातल्या ग्रामीण भागांत आजही मोबाईलला रेंज येत नाही. नेटवर्कमध्ये समस्या असल्यानं लोक झाडांवर चढतात. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे मंत्रिमंडळातील सहकारी बृजेंद्र सिंह यादव यांनादेखील या समस्येचा सामना करत आहेत. त्यांना फोनवरून बोलण्यासाठी ५० फूट आकाश पाळण्यात बसावं लागतं. आकाश पाळण्यात बसल्यावरच त्यांना नेटवर्क मिळतं. त्यामुळे दिवसातले ३ तास यादव आकाश पाळण्यात जाऊन बसतात. चपात्यांना थुंकी लावून लोकांना वाढायचा; समोर आला किळसवाणा प्रकार, व्हायरल होताच चोप चोप चोपलंलोक आरोग्य राज्यमंत्री असलेले यादव मूळचे मुंगावलीच्या सुरेल गावचे आहेत. सध्या गावात भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचे प्रमुख आयोजक यादवच असल्यानं ते ९ दिवस गावातच आहेत. खुद्द मंत्रीच गावात आल्यानं ग्रामस्थ मोठ्या अपेक्षेनं त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन जातात. गावकऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी यादव यांना फोनाफोनी करावी लागते. पण त्यासाठी मोबाईल नेटवर्क मिळत नाही.ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी यादव यांना अधिकाऱ्यांना सूचना द्याव्या लागतात. पण मोबाईलला रेंज नसल्यानं यादव यांना अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येत नाही. गावाच्या आसपास डोंगराळ भाग असल्यानं नेटवर्क मिळत नाही. त्यामुळेच यादव अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी दररोज आकाश पाळण्यात जाऊन बसतात. तिथून ते अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संवाद साधतात आणि लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात.
...म्हणून 'तो' मंत्री दररोज ५० फूट उंच आकाश पाळण्यात बसतो; तीन तास तिथेच थांबतो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 10:52 AM