COVID-19 vaccine: जर आपल्याकडे कोरोना साथीच्या आजाराला सामोरे जाण्यासाठी लसींचे तीन डोस मिळाले असतील तर आपल्याला चौथ्या लसीची आवश्यकता नाही अशी महत्त्वाची माहिती आयसीएमआर (ICMR) या प्रतिष्ठित संस्थेतील तज्ज्ञाने दिली आहे. कोविड-19 आणि त्यातील प्रकारांच्या पुराव्यांच्या आधारे, भारतीय वैद्यकीय संशोधन म्हणजेच ICMR मधील महामारीशास्त्र आणि संसर्गजन्य रोगाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी याबद्दलचे मत व्यक्त केले. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी तीन डोस घेतले असतील तर लसीचा चौथा डोस आवश्यक नाही.
"जर एखाद्या व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक लसीचे तीन डोस घेतले असतील, तर त्याला इतर गोष्टींची काळजी करण्याची फारशी गरज नाही. कारण कोरोनाच्या महामारीचा प्रसार रोखण्यासाठी या प्रतिबंधक लसीचे तीन डोस मिळणे पुरेसे आहे. कारण याचा अर्थ असा होतो की कोरोना साथीवर Immune Response कशाप्रकारे काम करते, याबद्दलचे प्रतिबंधक परीक्षण ३ वेळा झाले आहे," असे गंगाखेडकर एका कार्यक्रमानंतर बोलताना म्हणाले.
"कोरोनाचे सर्व व्हेरिएंट असूनही कोरोना विषाणू इतका बदलला नाही की त्याला नवीन लसीची आवश्यकता आहे. म्हणून लोकांनी टी-सेल रोगप्रतिकारक प्रतिक्रियेवर विश्वास ठेवला पाहिजे. ते सध्या संबंधित ट्रेंडचा पुरावा पाहिला जात आहे. तसेच व्हायरसच्या रूपात हे दाखविले जात आहे की हा प्रकार इतका गंभीर नाही. त्यामुळेच कोरोनाला रोखण्यासाठी चौथी लस आवश्यक नाही," असे गंगाखेडकर यांनी स्पष्ट सांगितले.
या दरम्यान, बदलत्या वातावरणात आणि ऋतुंमध्ये मास्कचा वापर करणे सुरूच ठेवले तर ते जास्त चांगले ठरेल आणि कोरोना संबधीच्या नियमांचे पालन करणेही उपयुक्त ठरेल, असा सल्ला त्यांनी दिला. त्याप्रमाणे, जे लोक आधीच काही आजार किंवा व्याधींनी ग्रस्त (comorbidity) आहेत, अशा लोकांनी या नियमांचे पालन करणे खूपच आवश्यक आहे, असा सल्ला त्यांनी दिला. "कोरोनाच्या चौथ्या डोसबद्दल एखाद्याने विचार करू नये. कोरोनाचा कोणताही नवीन डोस SPRS कोव्ह 2 सारखा नसेल. त्याऐवजी ते पूर्णपणे नवीन देखील असू शकेल. त्यामुळे जेव्हा जेव्हा असा फॉर्म येतो तेव्हा त्यानुसार त्याबद्दल काय करावे याबद्दल विचार केला जाईल. पण आता याबद्दल काळजी करणे निरर्थक आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.