नवी दिल्ली : २०२०-२१ या आगामी शैक्षणिक वर्षापासून देशात कोणतेही नवे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी न देण्याचे अ. भा. तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) ठरविले आहे. मात्र, महाविद्यालयांतील सोयी-सुविधांचा विचार करून तेथे अतिरिक्त जागा मंजूर करण्यावर परिषद निर्णय घेईल.हैदराबाद आयआयटीचे अध्यक्ष पीव्हीआर मोहन यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारशीनुसार परिषदेने हा निर्णय घेतला. परिषदेने २०२०-२१ पासून परवानगी देणे बंद करावे. त्यानंतर दर दोन वर्षांनी किती महाविद्यालयांची गरज आहे, याचा आढावा घ्यावा, असे समितीने सुचविले होते. देशात एकूण ३,२९१ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत व त्यांची प्रवेशक्षमता १५.५ लाख आहे. मात्र यापैकी ५१ टक्के जागा रिकाम्या राहिल्या होत्या.
पुढील वर्षापासून नवे इंजिनिअरिंग कॉलेज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 6:18 AM