गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळणही लागलं होतं. परंतु त्यानंतरही शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं आहे. अशातही देशात ६ फेब्रुवारी रोजी ३ तासांचं चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली. तसंच गाझीपूर सीमेवर काही आंदोलकांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिका केली होती. दरम्यान, यानंतर टिकैत यांनी संताप व्यक्त करत आपल्या व्यासपीठावरून पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्याबद्दल कोणीही अपशब्दांचा वापर करू शकत नाही आणि अपशब्दांचा वापर करणाऱ्यांना आपल्या व्यासपीठावर जागा नाही, असं म्हटलं."पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आपल्या व्यासपीठावरून कोणीही अपशब्दांचा वापर करू शकत नाही. काही लोकं मोंदीविरोधात अपशब्दांचा वापर करत आहेत अशा तक्रारी आल्या आहेत. ती आपले लोकं असूच शकत नाहीत. जी लोकं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्दांचा वापर करतील त्यांनी या ठिकाणाहून निघून जावं. तो त्याचा व्यक्तीगत निर्णय असेल. त्याला या व्यासपीठाचा वापर करू दिला जाणार नाही," असंही टिकैत यांनी स्पष्ट केलं. "जी लोकं कोणतीही आक्षेपार्ह वक्तव्य करतील त्यांच्याबद्दल आम्हाला सांगा. त्यांना हे व्यासपीठ सोडावंच लागेल. ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य असेल. या ठिकाणचं वातावरण बिलकुल खराब केलं जाऊ नये. जर आम्हाला कोणतीही गोष्ट योग्य वाटत नसेल तरी कोणाबद्दल अपशब्द काढण्याचे आपल्याला अधिकार नाहीत," असंही ते म्हणाले. दरम्यान, टिकैत यांना पंतप्रधान शेतकऱ्यांपासून केवळ एका फोनच्या दुरीवर आहेत याबाबत सवाल करण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांचा नंबर कोणता आहे सांगा, आम्ही त्यांच्याची चर्चा करू. सरकारसोबत जी कोणतीही चर्चा होईल ती शेतकरी संघटनांचीच होईल, असंही त्यांनी नमूद केलं.६ फेब्रुवारीला चक्का जाम६ फेब्रुवारीला राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर चक्का जाम करण्यात येणार आहे. दिल्लीसोबतचदिल्लीच्याबाहेर चक्का तीन तासांसाठी चक्का जाम केला जाईल, अशी माहिती भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिली. 'चक्का जाम आंदोलनावेळी वाहतूक कोंडीत अडकणाऱ्यांना पाणी आणि जेवण देण्यात येईल. सरकार आमच्यासोबत कशा प्रकारचं वर्तन करतंय याची माहितीदेखील आम्ही वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना प्रवाशांना देऊ,' असं टिकैत यांनी सांगितलं.Farmer Protest: 'त्या' ट्विटमुळे ग्रेटा थनबर्ग अडचणीत; दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखलभारतीय किसान संघाचा पाठिंबा नाहीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित भारतीय किसान संघानं चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही. 'दिल्लीच्या सीमावर्ती भागांत सुरू असलेलं आंदोलन पूर्णपणे राजकीय झालं आहे. हे आंदोलन राजकीय अजेंड्याचा भाग आहे. कॅनडा, ब्रिटिशमधील राजकीय नेते, काही सेलिब्रिटी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे हे आंदोलन म्हणजे भारताविरोधात सुरू असलेला अजेंडा आहे. यामुळे देशाच्या शांततेला धोका निर्माण झाला आहे,' असं भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय सचिव बद्री नारायण चौधरींनी सांगितलं.
Farmers Protest : टिकैत म्हणाले,"माझ्या व्यासपीठावरून पंतप्रधानांबद्दल अपशब्द काढू शकत नाही, अशांनी निघून जावं"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 7:00 PM
आंदोलनाचं वातावरण खराब न करण्याचं टिकैत यांचं आवाहन
ठळक मुद्देआंदोलनाचं वातावरण खराब न करण्याचं टिकैत यांचं आवाहन६ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या चक्का जाम, भारतीय किसान संघाचा पाठिंबा नाही