"आता ते कुणीही हटवू शकत नाही..."; सेंगोल हटवण्याच्या मागणीवरून गदारोळ, भाजपचं SP-काँग्रेसला प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 01:24 PM2024-06-27T13:24:15+5:302024-06-27T13:26:09+5:30

सेंगोल हे राजेशाहीचे प्रतीक असल्याचे म्हणत, ते काढून टाकावे आणि त्या जागेवर संविधान स्थापन करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाने (एसपी) केली आहे. 

No one can shake it now Uproar over Sengol's removal, BJP's response to SP-Congress  | "आता ते कुणीही हटवू शकत नाही..."; सेंगोल हटवण्याच्या मागणीवरून गदारोळ, भाजपचं SP-काँग्रेसला प्रत्युत्तर 

"आता ते कुणीही हटवू शकत नाही..."; सेंगोल हटवण्याच्या मागणीवरून गदारोळ, भाजपचं SP-काँग्रेसला प्रत्युत्तर 

लोकसभा निवडणूक 2024 नंतर संसदेचे पहिले अधिवेशन सुरू आहे. नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांचा शपथविधीनंतर आणि सभापती निवडीनंतर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला संबोधित केले. यानंतर, संसदेत स्थापन करण्यात आलेल्या सेंगोलवरून राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांनी संसद भवनातील सभापतींच्या आसनाजवळ लावण्यात आलेला सेंगोल हटवण्याची मागणी केली आहे. सेंगोल हे राजेशाहीचे प्रतीक असल्याचे म्हणत, ते काढून टाकावे आणि त्या जागेवर संविधान स्थापन करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाने (एसपी) केली आहे. 

"संविधान महत्वाचे" -
यासंदर्भात, समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार आरके चौधरी म्हणाले, "संविधान महत्त्वाचे आहे, ते लोकशाहीचे प्रतीक आहे. आपल्या गेल्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने संसदेत 'सेंगोल' स्थापन केले आहे. 'सेंगोल' म्हणजे 'राजदंड', याचा अर्थ 'राजाचा दंड' असाही होतो. राजेशाही संपवून देश स्वतंत्र झाला. देश 'राजाच्या दंडा'ने चालणार की संविधानाने? संविधान वाचवण्यासाठी संसदेतून सेंगोल हटविले जावे," अशी माझी मागणी आहे.

काय म्हणाले अखिलेश यादव? -
आरके चौधरी यांच्या विधानावर बोलताना समाजवादी पक्षाचे प्रमुख तथा खासदार अखिलेश यादव म्हणाले, "जेव्हा सेंगोल स्थापन करण्यात आला तेव्हा पंतप्रधान त्याच्यासमोर नतमस्तक झाले होते. कदाचित शपथ घेतांना ते हे विसरले. यामुळे, माझ्या पक्षाने त्यांना याची आठवण करून देण्यासाठी असे म्हटले असू शकते, असे मला वाटते. जर पंतप्रधानच त्याच्यासमोर नतमस्तक व्हायरला विसरले असतील, तर कदाचित त्यांचीही आणखी काही इच्छा असेल." अखिलेश यांच्या विधानावर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनीही, संविधान महत्वाचे आहे. आम्ही इंडिया ब्लॉकमध्ये यावर चर्चा करू, असे म्हटले आहे. 

समाजवादी पक्षाला काँग्रेस-आरजेडीचंही समर्थन -
यामुद्यावर काँग्रेस आणि आरजेडीनेही समाजवादी पक्षाचे समर्थन केले आहे. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी, भाजपने आपल्या मनाने सेंगोल लावला आहे. सपाची मागणी योग्य आहे. सभागृह सर्वांना सोबत घेऊन चालते. भाजप केवळ मनमानी करते, असे म्हटले आहे. तर आरजेडी नेत्या मीसा भारती यांनी, सेंगोल हटवायला हवे, हे लोकशाहीत आहे, राजेशाहीत नाही. सेंगोल म्यूझियममद्ये लावायला हवा. हे राजेशाहीचे प्रतिक आहे. यामुळे सेंगोल हटायला हवा.

भाजपचं प्रत्युत्तर -
आरके चौधरी यांच्या वक्तव्यावर भाजपचे लोकसभा खासदार खगेन मुर्मू म्हणाले, या लोकांना दुसरे काही काम नाही. यांनी संविधानाच्या बाबतीत लोकांमध्ये गैरसमज पसरवला. हे लोक संविधानाला मानत नाहीत. उलट मोदीजी संविधानाला अधिक सन्मान देतात. खासदार महेश जेठमलानी म्हणाले, सेंगोल हे देशाचे प्रतिक आहे. सेंगोल स्थापन करण्यात आले, ते आता कुणही हटवू शकत नाही.

केंद्रीय मंत्री जयंत चौधरी म्हणाले, ही लोक अशीच सर्व कामे करतात. हे देशाचे सर्वोच्च सभागृह आहे. हे लोक प्रसिद्धीसाठी असे बोलतात. आपण सर्वच जण संविधानाला मानतो. एकट्या समाजवादी पक्षाने संविधानाचा ठेका घेतलेला नाही.

Web Title: No one can shake it now Uproar over Sengol's removal, BJP's response to SP-Congress 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.