शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

कोणी भारताची एक इंचही जमिन घेऊ शकत नाही, अमित शहांचा चीनला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 9:21 AM

लडाख-चीन सीमारेषेवरील वादावर अमित शहांनी भाष्य करताना, मोदी सरकार देशाची एक-एक इंच जमिन वाचविण्यासाठी सक्षम असून कोणीही आमच्या जमिनीवर कब्जा करु शकत नाही, असं अमित शहांनी म्हटलंय.

ठळक मुद्देआम्ही देशाच्या सीमारेषेवरील एक-एक भूभागावर सावधानतेनं लक्ष देतोय. कोणीही आपल्या जमिनीवर कब्जा करु शकत नाही. आपलं सैन्य दल आणि देशाचं नेतृत्व अखंडता आणि सीमा सुरक्षेसाठी सक्षम आहे, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला.

लेह :  पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तेव्हापासून चीनबद्दल भारतात संतापाची भावना आहे. त्यातच, चीनने भारताच्या हद्दीतील जमीनीवर कब्जा केल्याच आरोप सातत्याने विरोधी पक्षांकडून लावण्यात येत आहे. विशेष म्हणजे, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीही चीनने जमिन बळकावल्याचं संसदेत बोलताना सांगितलं. आता, गृहमंत्री अमित शहा यांनी चीनला इशारा दिलाय. 

लडाख-चीन सीमारेषेवरील वादावर अमित शहांनी भाष्य करताना, मोदी सरकार देशाची एक-एक इंच जमिन वाचविण्यासाठी सक्षम असून कोणीही आमच्या जमिनीवर कब्जा करु शकत नाही, असं अमित शहांनी म्हटलंय. लडाख सीमारेषेवरील चीनच्या प्रत्येक कारवाईचा सामना करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलत आहे. आम्ही देशाच्या सीमारेषेवरील एक-एक भूभागावर सावधानतेनं लक्ष देतोय. कोणीही आपल्या जमिनीवर कब्जा करु शकत नाही. आपलं सैन्य दल आणि देशाचं नेतृत्व अखंडता आणि सीमा सुरक्षेसाठी सक्षम आहे, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, सध्या चीनने लडाखच्या सीमेवर चालविलेल्या कारवाया लक्षात घेता भारतीय लष्करानेही कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी मोठी पूर्वतयारी केली आहे. लडाखच्या सीमेवर तैनात भारतीय सैन्याला रसद पुरविण्याची कामगिरी सी-१७ ग्लोबमास्टर या विमानासह अन्य विमाने, हेलिकॉप्टर पार पाडत आहेत. तिशय उंचावर असलेल्या लेह हवाई तळावर सी-१७ ग्लोबमास्टर हे विमान उतरत असतानाचा एक व्हिडिओ सर्वत्र झळकला आहे. मोठ्या आकाराची संरक्षण उपकरणे, शस्त्रास्त्रे यांच्यापासून ते मोठ्या संख्येने सैनिक, अन्नधान्य व इतर गोष्टी यांची वाहतूक या विमानातून करता येते. सीमेच्या सर्वात जवळ असलेल्या चौक्यांमध्ये तैनात असणाऱ्या जवानांसह सर्व सैन्यालाच आवश्यक गोष्टींचा अखंड पुरवठा होत राहणे आवश्यक असते. युद्धाच्या प्रसंगात तर अशा रसदीचे महत्त्व अनन्यसाधारण असते.

लष्करप्रमुखांचे सीमेवरील स्थितीवर बारीक लक्षमॅकडोनल डग्लस या कंपनीने सी-१७ हे विमान अमेरिकी लष्करासाठी १९८० च्या दशकात तयार केले होते. या विमानाचा भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातही समावेश करण्यात आला आहे. सी-१७ ग्लोबमास्टर विमानातून रणगाडे, दारूगोळा, इंधन, अन्नधान्य, हिवाळ्यामध्ये लागणारे तंबू, गरम कपडे, अशा गोष्टींचा पुरवठा लडाख सीमेवरील भारतीय सैनिकांना केला जात आहे. सीमेवरील स्थितीपासून सर्व गोष्टींवर लष्करप्रमुख मनोज नरवणे हे स्वत: जातीने लक्ष ठेवून आहेत. वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी हवाई दलातील हेलिकॉप्टर, तसेच सी-१३० जे सुपर हर्क्युलससह अन्य विमानांचा लडाखमध्ये रसद पोहोचविण्यासाठी वापर केला जात आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाchinaचीनladakhलडाखNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार