शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
4
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
5
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
6
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
7
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
8
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
9
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
10
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
11
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
12
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
13
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
14
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
15
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
16
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
17
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
18
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा
19
Suraj Chavan : गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण?
20
भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू

हरयाणात एकालाही ७२० गुण नाहीत... 'नीट-यूजी'च्या निकालात दृश्य बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 6:26 AM

'एनटीए'ने पुन्हा निकाल जाहीर करताना परीक्षार्थ्यांची ओळख उघड केली नाही. तसे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 'एनटीए'ला दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: यंदा ५ मे रोजी झालेल्या नीट-यूजी परीक्षेचा केंद्र व शहरनिहाय निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शनिवारी जाहीर केला. याआधी या परीक्षेचा ५ जून रोजी निकाल जाहीर झाला होता; पण परीक्षेतील गैरप्रकारांमुळे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा वेगळ्या पद्धतीने निकाल जाहीर करण्याचे आदेश 'एनटीए'ला दिले होते. हरयाणातील नीट-यूजी परीक्षेच्या एका केंद्रात याआधी ७२० पैकी ७२० गुण मिळालेले सहा विद्यार्थी होते. मात्र, पुन्हा जाहीर केलेल्या निकालात त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना ६८२च्या पुढे गुण मिळविता आलेले नाहीत.

'एनटीए'ने पुन्हा निकाल जाहीर करताना परीक्षार्थ्यांची ओळख उघड केली नाही. तसे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 'एनटीए'ला दिले होते. गैरप्रकार झाल्याचे आरोप असलेल्या केंद्रांत इतर केंद्रांपेक्षा किती जास्त गुण मिळाले, ही माहिती कळण्यासाठी अशा पद्धतीने सुधारित निकाल जाहीर करण्यात आले.

बिहारमध्ये काय?बिहारमधील हजारीबाग येथील ओअॅसिस पब्लिक स्कूलच्या निकालांमध्ये वेगळे चित्र आढळले. या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी ओअॅसिस पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपलला अटक झाली होती. त्या केंद्रात ७०१ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. ओअॅसिस पब्लिक स्कूलमधील केंद्रात ७०० पेक्षाही कमी सर्वोच्च गुण मिळाले. सात विद्यार्थ्यांना ६५०हून अधिक, २३ विद्यार्थ्यांना ६००हून जास्त, ४६ विद्यार्थ्यांना ५५०हून जास्त गुण मिळाले आहेत.

जलाराम स्कूलमध्ये पाच जणांना ६५०हून अधिक गुणगुजरातच्या गोध्रा येथील जलाराम इंटरनॅशनल स्कूलमध्ये परीक्षेला १,८३८ विद्यार्थी बसले होते. तिथे ७०० पेक्षाही कमी सर्वोच्च गुण मिळाले, पाच विद्यार्थ्यांना ६५०हून अधिक, १४ जणांना ६००हून जास्त, ३१ जणांना ५५०हून अधिक गुण मिळाले आहेत.

अहमदाबादमध्ये १२ विद्यार्थ्यांना ७००हून अधिक गुणअहमदाबाद येथील परीक्षा केंद्रात नीट-यूजी परीक्षेत याआधी ६७६ पैकी १२ विद्यार्थ्यांनी ७००पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात सोमवारी नीट-यूजी याचिकांच्या सुनावणीप्रसंगी उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.

आता सोमवारी सुनावणीफेरपरीक्षा घ्यावी या मागणीसाठी केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी, २२ जुलै रोजी सुनावणी होईल. या परीक्षेचा केंद्र, शहरनिहाय जो निकाल जाहीर करण्यात आला, त्यातून नेमके काय निष्कर्ष हाती आले. यावर आता विचार होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयneet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीक