शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

कोणीही रिकाम्या पोटी झोपू नये, ही सरकारची जबाबदारी - सर्वोच्च न्यायालय 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 6:06 AM

कोविड महामारी व लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित कामगारांच्या दुर्दशेशी संबंधित स्वत:च दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने हे निर्देश दिले.

नवी दिल्ली : कोणीही रिकाम्या पोटी झोपू नये, याची काळजी घेणे, ही आपली संस्कृती आहे, याची आठवण करून देत सुप्रीम कोर्टाने मंगळवारी केंद्र सरकारला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अन्नधान्य शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल, याची काळजी घेण्यास सांगितले. न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने केंद्राला वरील निर्देश दिले.

कोविड महामारी व लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित कामगारांच्या दुर्दशेशी  संबंधित स्वत:च दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने हे निर्देश दिले. आम्ही असे म्हणत नाही की केंद्र काहीही करत नाही. केंद्राने कोविडदरम्यान लोकांना अन्नधान्य सुनिश्चित केले होते. ते यापुढेही चालू राहिले पाहिजे. कोणीही रिकाम्या पोटी झोपू नये, ही आपली संस्कृती आहे, असे   कोर्टाने म्हटले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ८ डिसेंबर रोजी आहे. 

अन्न हा मूलभूत अधिकार सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी केंद्राला एनएफएसएचे फायदे २०११च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार मर्यादित नाहीत ना, याची खात्री करण्यास सांगितले होते. याशिवाय घटनेच्या कलम २१नुसार ‘अन्नाचा अधिकार’ हा  मूलभूत अधिकार आहे, असे स्पष्ट करत अधिक गरजू लोकांना या कायद्यांतर्गत समाविष्ट केले पाहिजे, असे निर्देश दिले होते. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय