नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या कारवाईत खात्मा करण्यात आलेल्या 13 दहशतवाद्यांबाबत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सहानुभूती व्यक्त केली आहे. त्याने लष्कराकडून करण्यात आलेल्या या कारवाईविरोधात गरळ ओकत ट्विट केले. यामध्ये त्याने काश्मीरमधील स्थिती गंभीर असल्याचे सांगत संयुक्त राष्ट्रसह आतंरराष्ट्रीय संघटनांच्याबाततीत सुद्धा प्रश्न उपस्थित केला आहे. शाहिद आफ्रिदीच्या या ट्विटवर भारताचा कर्णधार विराट कोहली, गौतम गंभीर, सुरेश रैना आणि कपिल देव यांनी त्याला चांगलेच धारेवर धरल्यानंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सुद्धा त्याला फटकारले आहे. आमचा देश चालविण्यासाठी आमच्याकडे सक्षम लोक आहेत. बाहेरच्यांनी आम्हाला काय करावे आणि काय करु नये, याबाबत सल्ला देण्याची गरज नाही, अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने शाहिद आफ्रिदीला फटकारले आहे.