शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादा महायुतीत आले नसते, तर आम्ही १०० जागा जिंकल्या असत्या”; शिंदेसेनेतील नेत्याचे विधान
2
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान; चर्चांना उधाण
3
'भाजपच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा; आमच्या मनात किंतु परंतु नाही,' एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती
4
चांगले मायलेज मिळण्यासाठी बाईकचा वेग किती असावा? या गोष्टी लक्षात असुद्या...
5
“मला CSK मध्ये जायचं होतं पण…”; Mumbai Indians ने विकत घेतलेला Deepak Chahar नाराज?
6
झोमॅटोची खास ऑफर! सहा महिन्यांपर्यंत मिळेल फ्री फूड डिलिव्हरी!
7
EVM हॅकिंगचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल;  निवडणूक आयोगाने दिलं सविस्तर स्पष्टीकरण
8
२०२३-२४ मध्ये सात राज्यांत लाडक्या बहिणींमुळे सत्ता आली, राजस्थानमध्ये गेली... नेमके काय घडले...
9
BSNL चे 5 सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, किंमत 100 रुपयांपेक्षा कमी
10
कृष्णासोबत भांडणाचं नेमकं काय कारण होतं? अखेर गोविंदाने खुलासा केला; म्हणाला- "माझी बायको त्यावेळी..."
11
मनसेला पुन्हा धक्का! पराभूत अविनाश जाधवांनी घेतला मोठा निर्णय; राज ठाकरेंना लिहिले पत्र
12
“उद्धव ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
13
आता 'या' मंदिर परिसरात राजकीय आणि द्वेषपूर्ण भाषणांना बंदी, कारण...
14
VIDEO: भन्नाट जुगाड! JCB ला ट्रॉली लटकवून मजुरांनी तिसऱ्या मजल्यावर केलं भिंतीला प्लास्टर
15
कोरोनापासून मोठ्या जॅकपॉटच्या मागावर होता चीन; आता १००० मेट्रीक टनांचा खजिनाच हाती लागला... 
16
"...तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो"; मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता
17
चंद्रबाबू नायडू सरकारचा मोठा निर्णय! आंध्र प्रदेशातील वक्फ बोर्ड केलं बरखास्त
18
देव दीपावली: ७ राशींवर अपार कृपा, सुख-सौभाग्य प्राप्ती; यश-प्रगती, लाभच लाभ, शुभ घडेल!
19
“EVMमध्ये गडबड, ठोस पुरावा मिळणे कठीण, आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करा”: पृथ्वीराज चव्हाण
20
रतन टाटांनी बिग बींकडे मागितले होते उसने पैसे! कारण ऐकून बॉलिवूडचा 'शहेनशाह' झाला थक्क

आता 'या' मंदिर परिसरात राजकीय आणि द्वेषपूर्ण भाषणांना बंदी, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2024 3:51 PM

यासंदर्भात शनिवारी टीटीडीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

Tirumala temple : आंध्र प्रदेशातील तिरुमला मंदिर परिसरात खास इशारा देण्यात आला आहे. भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे संरक्षक तिरुमला तिरुपती देवस्थानमने  (टीटीडी) तिरुमलामध्ये राजकीय आणि द्वेषपूर्ण भाषणांवर बंदी घातली आहे. अलीकडील घटना लक्षात घेता राजकीय आणि द्वेषपूर्ण भाषणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे टीटीडीने सांगितले.

यासंदर्भात शनिवारी टीटीडीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. राजकारण्यांसह काही लोकांनी दर्शनानंतर मंदिर परिसराजवळ मीडियासमोर राजकीय किंवा प्रक्षोभक विधाने केली होती. त्यामुळे येथील आध्यात्मिक शांतता भंग पावली आहे, असे टीटीडीने म्हटले आहे. तसेच, मंदिराचे पावित्र्य आणि आध्यात्मिक शांततेचे रक्षण करण्यासाठी द्वेषपूर्ण भाषणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे टीटीडीने म्हटले आहे.

याचबरोबर, सर्वांना या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहन टीटीडीने केले असून उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. दरम्यान, हा नियम बऱ्याच काळांपासून लागू आहे. उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत, असे आंध्र प्रदेशचे माजी मुख्य सचिव एल.व्ही.सुब्रमण्यम यांनी सांगितले. सुब्रमण्यम यांनी टीटीडीचे कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे.

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटTempleमंदिरAndhra Pradeshआंध्र प्रदेश