शौचालयात अन्न शिजवण्यास हरकत नाही, महिला मंत्र्याचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 02:33 PM2019-07-24T14:33:59+5:302019-07-24T14:45:23+5:30
'शौचालयाच्या खोलीत जर टॉयलेट सीट आणि जेवण तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा स्टोव्ह यामध्ये विभाजक असेल तर शौचालयामध्ये अन्न शिजवण्यास काही हरकत नाही'
नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या महिला-बाल विकास मंत्री इमरती देवी यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. 'शौचालयाच्या खोलीत जर टॉयलेट सीट आणि जेवण तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा स्टोव्ह यामध्ये विभाजक असेल तर शौचालयामध्ये अन्न शिजवण्यास काही हरकत नाही' असं अजब विधान इमरती देवी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशच्या एका जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रामधील कर्मचारी मुलांसाठी शौचालयाच्या खोलीत अन्न शिजवत असल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या घटनेवर प्रतिक्रिया देताना इमरती देवी यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.
'अंगणवाडी केंद्रातील शौचालयात टॉयलेट सीट आणि स्टोव्ह यांच्यामध्ये विभाजक बसवलेला हे समजून घ्या. आपल्या घरातही अशाच प्रकारे टॉयलेट-बाथरूम अटॅच असलेले पाहायला मिळतात. जर आपल्या घरात अशा प्रकारचे अटॅच बाथरुम असेल आणि त्यावरुन जर आपल्या नातेवाईकांनी आपल्या घरी जेवण करण्यास नकार दिला तर आपण काय बोलाल?, शौचालयात अन्न शिजवण्यास हरकत नाही' असं इमरती देवी यांनी म्हटलं आहे.
No problem in preparing food inside toilet: MP Minister Imarti Devi
— ANI Digital (@ani_digital) July 24, 2019
Read @ANI Story | https://t.co/rFJJ0Q11oBpic.twitter.com/BzNOscb6VK
महिला आणि बाल विकास कार्यक्रमाचे जिल्हा अधिकारी देवेंद्र सुंद्रयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगणवाडी केंद्रात एका शौचालयासह असलेल्या छोट्या स्वयंपाकघरात मुलांसाठी अन्न शिजवण्यात आले आहे. याप्रकरणात सहभागी असलेल्या अंगणवाडी आणि इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
Madhya Pradesh: Toilet of an Anganwadi centre in Karera, Shivpuri being used as a makeshift kitchen. District Officer,Women&Child programme says "A self help group had taken control of toilet & were using it as a kitchen. Action being taken against Anganwadi supervisor & workers" pic.twitter.com/b9IwO1zlSk
— ANI (@ANI) July 23, 2019
इमरती देवी यांना याआधी प्रजासत्ताक दिनी लिहून देण्यात आलेले भाषण वाचता आले नव्हते. त्यांनी आपले काम जिल्हाधिकाऱ्यांना करण्यास भाग पाडले. दरम्यान, यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ग्वालियर येथील एसएएफ ग्राऊंडमध्ये 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इमरती देवी यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात भाषणादरम्यान इमरती देवी यांची चांगलीच दमछाक झाली. लिहून दिलेले भाषण त्यांना पूर्ण वाचता आले नाही. जवळास भाषणातील 50 शब्द त्यांनी अडखळत वाचले. त्यामधीलही काही शब्द चुकीचे उच्चारले. त्यानंतर त्यांनी भाषण अर्धवट सोडले आणि भाषण वाचण्याची धूरा चक्क जिल्हाधिकाऱ्यांवरच टाकली. त्यानंतर जिल्हाधिकारी भरत यादव यांनी त्यांचे भाषण पूर्ण वाचून दाखविले होते.