शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
4
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
5
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
6
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
7
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
8
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
9
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
10
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
11
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
12
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
13
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
14
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
15
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
16
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
17
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
18
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
19
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
20
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुस्लिम आरक्षणाबाबतचा रिपोर्ट फेटाळला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 3:09 PM

Karnataka CM Siddaramaiah : १ कोटी रुपयांपर्यंतच्या सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांमध्ये मुस्लिम कंत्राटदारांना ४ टक्के कोटा देण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

बंगळुरू: नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना आरक्षण देण्याची कोणतीही योजना नसल्याचे विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना कर्नाटक सरकारने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, १ कोटी रुपयांपर्यंतच्या सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांमध्ये मुस्लिम कंत्राटदारांना ४ टक्के कोटा देण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केले निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "काही माध्यमांमध्ये मुस्लिमांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा प्रस्ताव सरकारसमोर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, मुस्लिम आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे, मात्र यासंदर्भात सरकारपुढे कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे."

४ टक्के कोटा, जो श्रेणी-२बी अंतर्गत येतो, सार्वजनिक बांधकाम कंत्राटदारांसाठी एकूण आरक्षण ४७ टक्के पर्यंत वाढले असते. कर्नाटकच्या सध्याच्या वाटपामध्ये ४३ टक्के सरकारी कंत्राट विशिष्ट सामाजिक समूहासाठी राखीव आहेत. एससी/एसटी कंत्राटदारांसाठी २४ टक्के, श्रेणी-१ OBC साठी ४ टक्के आणि श्रेणी-२ ए ओबीसीसाठी १५ टक्के आहे.

राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी सांगितले की, सिद्धरामय्या यांचे राजकीय सचिव नसीर अहमद, गृहनिर्माण आणि वक्फ मंत्री बीजे जमीर अहमद खान आणि इतर मुस्लिम आमदारांसोबत २४ ऑगस्ट रोजी एक पत्र जारी करण्यात आले होते. त्यामध्ये मुस्लिमांसाठी ४ टक्के आरक्षणाची विनंती प्रस्ताव करण्यात आली होती. पुढे ते म्हणाले की, सिद्धरामय्या यांनी वित्त विभागाला त्याच दिवशी प्रस्तावाचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिले होते, त्यांनी या प्रकरणाशी संबंधित कर्नाटक सार्वजनिक खरेदी पारदर्शकता (KTPP) कायद्यातील सुधारणांचे समर्थन केले होते.

याचबरोबर, आर अशोक यांनी म्हणाले, तुम्ही या प्रकरणाच्या संदर्भात केटीपीपी कायद्यातील दुरुस्तीला मान्यता दिली आहे. ही सर्व पत्रे आणि मान्यता असूनही तुम्ही खोटे बोलत आहात आणि सरकारसमोरील प्रस्तावांमध्ये मुस्लिम आरक्षणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचा दावा करत आहात. तुमच्यात प्रामाणिकपणा किंवा नैतिकतेची भावना आहे का? असा सवाल करत मुस्लीम आरक्षणाचा प्रस्ताव नाकारून मुख्यमंत्र्यांनी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोपही आर अशोक यांनी केला.

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारण