मुलं आणि लग्नाच्या मुद्द्याव आसामचे राजकारण चांगलेच तापले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या लग्नासंदर्भातील सल्ल्यावर, जर आपल्याला लग्न करायचे असेल, तर आपण परवानघी घेण्यासाठी येणार नाहीत, असे AIUDF प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी धुबरी मतदार संघातील काँग्रेस उमेदवार रकीबुल हुसैन यांच्यावर निशाणा साधत, त्यांच्याकडे केवळ एकच मूल जन्माला घालायची ताकत आहे, असे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर, लगेचच समान नागरिक संहिता अर्थात UCC लागू होणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे.
खरे तर, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी निवडणुकीनंतर यूसीसी लागू होण्याचे संकेत दिले होते. तसेच, जर त्यांना (अजमल) दुसऱ्यांदा लग्न करायचे असेल तर, निवडणुकीपूर्वी करून घ्यावे. कारण UCC लागू झाल्यानंतर, बहुविवाहावर बंदी येईल. यावर, AIUDF प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी सरमा यांना प्रत्युत्तर देत, 'जर मला दुसरे लग्न करायचे असेल तर,मी मुख्यमंत्र्यांना विचारण्यासाठी जाणार नाही.'
'एक मुल जन्माला घालू शकत नाही' -याचवेळी, अजमल यांनी काँग्रेस उमेदवार हुसैन यांनाही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, 'त्यांच्यात (रकीबुल हुसैन) ताकद नाही आणि केवळ एकाच मुलाला जन्म दिला आहे. मी 7 मुलांना जन्म दिला आहे आणि आता त्यातील काही तरुण आहेत.' तत्पूर्वी, काँग्रेस उमेदवाराने अजमल यांना 'म्हातारा वाघ' म्हटले होते. यानंतर, 'मी अद्याप एवढा म्हातारा नाही. मी दुसऱ्यांदा लग्न करू शकतो,' असेही AIUDF प्रमुखांनी अजमल यांनी म्हटले आहे.