Dunky Flight : ( Marathi News ) - काही दिवसांपूर्वी मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रेंच अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर तीन दिवसांनी ३०० प्रवाशांना घेऊन एक विमान मुंबई विमानतळाकडे रवाना झाले आहेत. यात बहुतांश प्रवासी भारतीय होते. या प्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. या विमानात बसलेला २ वर्षाचा मुलगा बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.
रोमानियाच्या 'लिजेंड एअरलाइन्स' कंपनीचे एअरबस A-340 विमान मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्समधील व्हॅट्री विमानतळावर चार दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आले. या विमानात एकूण ३०३ भारतीय प्रवासी होते. त्यापैकी २७६ प्रवासी २६ डिसेंबर रोजी मुंबई विमानतळावर उतरले. उर्वरित २७ प्रवासी फ्रान्समध्येच राहिले कारण त्यांनी तेथे आश्रयासाठी अर्ज केला होता. हे विमान दुबईहून निकाराग्वाला जात होते. विमानात बसलेल्या भारतीय प्रवाशांपैकी एक तृतीयांश गुजराती होते.
नववर्षाच्या सुरुवातीलाच जपानमध्ये भीषण भूकंप, तीव्र धक्क्यांनंतर त्सुनामीचाही इशारा
या फ्लाइट'मध्ये दोन वर्षांचे बालकाबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. गुजरातपोलिसांनी मुलाचा शोध घेण्यासाठी आणि त्याच्या पालकांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
हा मुलगा मानवी तस्कराचा काही भाग होता का आणि यूएस-कॅनडा सीमेवर अनेक मुलांप्रमाणेच त्यालाही तिथेच सोडले आहे का याची माहिती पोलीस घेत आहेत. गुजरात पोलिस सीआयडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'उत्तर गुजरातमध्ये अनेक कुटुंबांनी आपली घरे सोडल्यामुळे आम्ही मुलाचा आणि त्याच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत.'
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातहून निकाराग्वाला ९६ जणांसह ३०३ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान २१ डिसेंबर रोजी फ्रेंच अधिकाऱ्यांनी मानवी तस्करीच्या संशयावरून वात्री येथे थांबवले होते. २४ डिसेंबर रोजी न्यायालयाच्या आदेशानंतर प्रवाशांना सोडण्यात आले. त्यापैकी २७६ मुंबईत उतरले. त्यापैकी ७२ गुजरातमधील होते. परत आणलेल्या भारतीय प्रवाशांच्या यादीमध्ये २ ऑगस्ट २०२१ रोजी गुजरातमध्ये जन्मलेल्या मुलाचाही समावेश आहे, या मुलाची विमानतळावर सोबत नसलेली अल्पवयीन म्हणून ओळख झाली आहे.
गुजरातमधील मेहसाणा आणि गांधीनगर येथून बेकायदेशीर स्थलांतराची व्यवस्था करणारे एजंट अनेकदा बनावट कुटुंबे तयार करतात. यामध्ये अनोळखी लोक दुसऱ्याच्या मुलांना सोबत घेतात जेणेकरून ते स्वतःला जोडपे म्हणून समोर जातात.
अमेरिकन आश्रय मिळण्याची शक्यता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. 'मुलांसह जोडप्यांना यूएस आश्रय अधिक सहजपणे मिळण्याची शक्यता असते.' तपासात असे समोर आले आहे की, दोन वर्षांच्या मुलाशिवाय, फ्लाइटमध्ये एक १० वर्षांचा आणि दोन १७ वर्षांची मुले देखील होते ज्यांना सोबत नसलेले अल्पवयीन म्हणून सांगितले आहे.
यातील बहुतेक मुले १० ते १४ वर्षे वयोगटातील आहेत, पण अशी प्रकरणे देखील समोर आली आहेत, ज्यात चार वर्षांपेक्षा कमी वयाची मुले सोडून दिली आहेत. एकट्या ऑक्टोबर २०२३ मध्ये, ७८ मुले सीमेवर सापडली, ज्यात ७३ मेक्सिको सीमेवर, याला 'डंकी मार्ग’ म्हणून ओळखले जाते, तर पाच कॅनडा सीमेवर सापडले.