नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी काश्मीर खोऱ्यात लँडलाईन, इंटरनेट व एसएमएस सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून तब्बल 5 महिन्यांनी जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ‘2-जी’ मोबाईल इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली. दरम्यान काश्मीरमधील इंटरनेटच्या वापरासंदर्भात नीती आयोगाच्या सदस्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी अश्लिल चित्रपट पाहण्यासाठी काश्मीरमध्ये इंटरनेटचा वापर होतो असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'काश्मीरमध्ये हे सर्व नेते कशासाठी जाऊ इच्छित आहेत? दिल्लीच्या रस्त्यांवर ज्या प्रकारे आंदोलनं सुरू आहेत. त्यांना काश्मीरच्या रस्त्यांवरही अशीच आंदोलनं करायची आहेत. सोशल मीडियाचा ते वापर करतात. त्यामुळे जर तिकडे इंटरनेट नसेल तर काय फरक पडतो? तसंही इंटरनेटच्या माध्यमातून तिकडे लोक काय पाहतात? अश्लिल चित्रपट पाहण्याशिवाय लोक काहीही करत नाहीत' असं व्ही. के. सारस्वत यांनी म्हटलं आहे.
जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूमधील 10 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली आहे. काश्मीरमधील केवळ कुपवाडा आणि बांदीपोरा या ठिकाणी 2जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. 15 जानेवारीपासून सात दिवसांपर्यंत जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ‘2-जी’ मोबाईल इंटरनेट सुविधा देण्यात आली आहे. गृहविभागाकडून देण्यात आलेल्या आदेशामध्ये काश्मीर विभागात अतिरिक्त 400 इंटरनेट कियोस्कची स्थापना केली जातील. इंटरनेट सेवा देणारे आवश्यक सेवा देणाऱ्या सर्व संस्था, रुग्णालय, बँकाबरोबच शासकीय कार्यालयात ब्रॉडबॅण्ड सुविधा देण्यात येईल. पर्यटकांच्या सुविधेच्या दृष्टीने ब्रॉडबॅण्ड इंटरनेट हॉटेल आणि यात्रा कंपन्यांना पुरवले जाणार आहेत. जम्मू परिसरातील सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासीमध्ये ई-बँकींगसह सुरक्षित वेबसाईट पाहण्यासाठी पोस्टपेड मोबाईलवर 2जी मोबाईल इंटरनेटला परवानगी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
दोन मुलं जन्माला घालण्याच्या वक्तव्यावरून मोहन भागवतांचा यू-टर्न
थेट लग्नपत्रिकेतून तरुणाने दिला 'सीएए'ला पाठिंबा
24 जानेवारीला महाराष्ट्र बंद; आंबेडकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
Delhi Election: काँग्रेसमध्ये घराणेशाही, पक्षातील नेत्यांच्या डझनभर मुला-मुलींना उमेदवारी
India Vs Australia Live Score: ऑस्ट्रेलियाचे शतक, स्मिथ-लाबुशेनची अर्धशतकी भागीदारी