लेखी परीक्षा नाही! उच्च न्यायालयात नोकरीची संधी; क्लार्क पदासाठी 102 जागांवर भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 06:29 PM2020-07-20T18:29:35+5:302020-07-20T18:31:07+5:30
एकूण पदांची संख्या, निवड प्रक्रिया, अर्ज कसा भरावा याची माहिती देण्यात आली आहे. सोबत जाहिरातीची लिंकही देण्यात येत आहे.
जर तुम्ही कायद्याचा अभ्यास केला असेल तर तुमच्यासाठी उच्च न्यायालयामध्ये नोकरीची संधी आहे. ही भरती अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये होणार आहे. या उच्चन्यायालयातील रिक्त 100 हून अधिक जागांवर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी जाहिरातही प्रसिद्ध झाली आहे.
Allahabad High Court Law Clerk recruitment 2020: एकूण पदांची संख्या, निवड प्रक्रिया, अर्ज कसा भरावा याची माहिती देण्यात आली आहे. सोबत जाहिरातीची लिंकही देण्यात येत आहे.
पदाचे नाव - लॉ क्लार्क
पदांची संख्या - 102
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. याची प्रक्रिया सुरु झाली असून शेवची तारीख 8 ऑगस्ट आहे. इच्छुक उमेदवार अलाहाबाद न्यायालय आणि लखनऊ बेंचमधून 300 रुपये देऊन अर्ज खरेदी करू शकतात. किंवा खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज डाऊनलोड किंवा प्रिंट काढू शकतात. यानंतर 300 रुपयांचा डीडी अर्जासोबत जमा करावा लागणार आहे.
उमेदवाराने सर्व माहिती भरलेला अर्ज 8 ऑगस्टला रजिस्ट्रार जनरल, हायकोर्ट ऑफ ज्युडीकेचर, अलाहाबाद या पत्त्यावर स्पीड पोस्टाने, रजिस्टर्ड पोस्ट किंवा कुरिअरने पाठवावे. या पदासाठी केवळ कायद्याची पदवी (एलएलबी) पास गरजेचे आहे. उमेदवाराचे वय 21 ते 26 वर्षांच्या आत असावे. आरक्षणानुसार वयाची अट वेगवेगळी राहणार आहे. 1 जुलै 2020 रोजीचे वय गृहीत धरले जाणार आहे.
उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा....
अन्य महत्वाच्या बातम्या...
सौदी अरेबियाचे किंग सलमान हॉस्पिटलमध्ये दाखल; वय 84 वर्षे
...तर 'ढोंगी' TikTok ला भारतात प्रवेश मिळू शकतो? चिनी कंपनीचे मोठे कारस्थान
भारत vs चिनी 'राफेल'! सामना रंगला; पहा कोण जादा शक्तीवान?
Sarkari Nokari : थेट सातवा वेतन आयोग; केंद्र सरकारने काढली पोलिसांची बंपर भरती
कुठेय मंदी! 'या' बँकेच्या संचालकाला सर्वाधिक वेतन; उदय कोटक यांचा पगार घटला