ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 10 - देशातील बहुतेक सर्व राज्यांमधील जवान लष्करात जाऊन शहिद होतात. मग गुजरातमधील जवान का शहीद होत नाहीत? असा अजब सवाल उपस्थित करत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. अखिलेश यादव यांनी हे विधान केल्यापासून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
बुधवार अखिलेश यादव म्हणाले, "उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दक्षिण भारतासह देशातील प्रत्येक भागातील जवान शहीत झाले आहेत, पण गुजरातमधील कुठल्या जवानाला वीरमरण आले असल्यास सांगा." अखिलेश यादव यांनी हे वक्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्य करून केल्याचे बोलले जात आहे.
गेल्या काही काळापासून हिंसाचाराच्या घटनांमुळे जम्मू आणि काश्मीमध्ये अशांतता माजली आहे. तेथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सातत्याने चकमकी होत आहेत. त्याबरोबरच सीमेपलीकडून पाकिस्तान सातत्याने गोळीबारच्या घटनाही घडत आहेत. त्यात जवानांना वीरमरण येत आहे, त्या पार्श्वभूमीवर अखिलेश यांनी हे वक्तव्य केले आहे.
एकीकडे आपले जवान देशासाठी शहीद होत असतानाच राजकारणी मात्र या मुद्यावर राजकारण करण्याचे सोडत नाहीत. दुसरीकडे आजच दहशतवाद्यांनी लष्काराचे एक अधिकारी उमर फैय्याज यांची अपहरण करून हत्या केली आहे.
UP, Madhya Pradesh, Dakshin Bharat har jagah se shaheed huye hain, Gujarat ka koi jawan shaheed hua ho toh batao: Akhilesh Yadav pic.twitter.com/1eN85HemJh— ANI UP (@ANINewsUP) May 10, 2017