शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

देशाला लुटणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 5:21 PM

देशाला धोका देणाऱ्या किंवा लुटणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे

ठळक मुद्देमदुराई येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोकशी यांचा स्पष्ट संदर्भ देत, देशाला धोका देणाऱ्या किंवा लुटणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा दिलासोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विरोध होत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूचा दौरा करून विविध विकासकामांची पायाभरणी केली खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणामुळे दलित, आदिवासी आणि अन्य घटकांसाठी असलेल्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही

मदुराई ( तामिळनाडू) -  विजय माल्या, निरव मोदी, मेहूल चोकशी यांच्यासारखे उद्योगपती हजारो कोटींचा घोटाळा करून परदेशात पसार झाल्याने केंद्रातील मोदी सरकारची नाचक्की झाली आहे. दरम्यान, आज मदुराई येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोकशी यांचा स्पष्ट संदर्भ देत, देशाला धोका देणाऱ्या किंवा लुटणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विरोध होत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूचा दौरा करून विविध विकासकामांची पायाभरणी केली. यावेळी मदुराई येथे एम्सची पायाभरणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेला संबोधित केले. त्यात त्यांनी काँग्रेसवर टीका केली. तसेच सर्वसामान्य प्रवर्गातील गरीबांना दिलेल्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या डीएमकेवरही टीकेची तोफ डागली. स्वच्छ भारत अभियानामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले.  ''तामिळनाडूमधील काही लोक आपले हितसंबंध राखण्यासाठी संशय आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण करत आहेत. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणामुळे दलित, आदिवासी आणि अन्य घटकांसाठी असलेल्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही. शिक्षण आणि रोजगाराच्या संधी सर्वांना मिळाव्यात म्हणून हे आरक्षण लागू करण्यात आले आहे.''असे सांगत या आरक्षणाला विरोध करणाऱ्या डीएमकेवर मोदींनी टीका केली. डीएमकेने आर्थिक निकषावरील आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTamilnaduतामिळनाडूIndiaभारतPoliticsराजकारण