SHO wife save girl child: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा या हायटेक शहरातील SHO च्या पत्नीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. विनोद सिंह असे या एसएचओचे नाव असून, त्यांच्या पत्नीने माणुसकीचे मोठे उदाहरण दिले आहे. जन्मदात्यांनी कडाक्याच्या थंडीत टाकून दिलेल्या नवजात बाळाला पोलीस पत्नीने स्वतःचे दूध पाजून नवजीवन दिले आहे.
पोलिसांचेही असेही रुपकाही दिवसांपूर्वी नॉलेज पार्क परिसरातील झुडपात एक नवजात अर्भक पडल्याची बातमी आली होती. माहिती मिळताच पोलिसांनी त्या बाळाला पोलीस ठाण्यात आणले. भूक आणि थंडीमुळे ते बाळ खूप रडत होते. यावेळी एसएचओ विनोद सिंह यांना या चिमुकलीची माहिती मिळताच त्यांनी पत्नीला बोलावले आणि त्या बाळाला दूध पाजण्यास सांगितले. यावर त्यांची पत्नी ज्योती ताबडतोब तयार झाल्या आणि त्यांनी बाळाला स्वतःचे दूध पाजले.
चिमुकली सध्या ठीक आहेया मुलीला अशा कडाक्याच्या थंडीत सोडून पळ काढणाऱ्या आई-वडिलांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीचा जीव वाचवणाऱ्या ज्योती म्हणाल्या की, त्या चिमुकलीचे शरीर थंड पडले होते. ती भुकेने व्याकुळ होत होती. अशा परिस्थितीत मुलीला ऊब देण्यासाठी तिला ब्लँकेटमध्ये गुंडाळून जवळ ठेवले. आराम मिळाल्यावर तिने रडणे थांबवले. काही वेळाने चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मुलीची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.
ज्योती सिंह यांचे पालकांना आवाहनज्योती सिंह यांनी लोकांना कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांचा बळी देऊ नका, असे आवाहन केले आहे. ज्योती म्हणाल्या की, 'मला समजत नाही की आपल्या तान्ह्या बाळांसोबत कोणी असं कसं करू शकते? कोणाला जर आपल्या मुलाची काळजी घेण्यात काही अडचण येत असेल तर त्यांना अनाथाश्रम किंवा एनजीओ सारख्या सुरक्षित ठिकाणी द्या. तिथे त्यांचे योग्य पालनपोषण केले जाऊ शकते. पण, असे रस्त्यावर टाकून जाऊ नका.'