शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

बिहारसाठी रालोआचे जागावाटप जाहीर

By admin | Published: September 15, 2015 5:10 AM

तीन दिवसांच्या प्रचंड परिश्रमानंतर बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची समजूत घालण्यात भाजपाला अखेर सोमवारी यश आले. जागावाटपाबाबत झालेल्या अंतिम समझोत्यानुसार

- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीतीन दिवसांच्या प्रचंड परिश्रमानंतर बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची समजूत घालण्यात भाजपाला अखेर सोमवारी यश आले. जागावाटपाबाबत झालेल्या अंतिम समझोत्यानुसार बिहारमध्ये भाजपा १६0, पासवान यांचा लोजपा ४0, उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोकसमता पक्ष २३ आणि जीतनराम मांझींचा हिंदुस्तान अवाम पक्ष (हम) २0 जागांवर निवडणूक लढवेल. याखेरीज ‘हम’चे काही उमेदवार भाजपाच्या चिन्हावरही निवडणूक लढतील, अशी घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात घाईगर्दीत बोलावलेल्या पत्रपरिषदेत केली.भाजपाने सुरुवातीला पासवान यांना ४0 व ‘हम’ला अवघ्या १३ जागा देऊ केल्या. तेव्हा मांझी भलतेच भकडले होते. पासवान दलितांचे दिखाऊ नेते आहेत. आजवर त्यांनी फक्त कुटुंबाचाच विचार केला. बिहारचा दलित व महादलित समाज त्यांचे नेतृत्व मानत नाही, अशी कठोर टीका मांझींनी जाहीरपणे केली. ‘हम’चे १३ आमदार आहेत. महादलित मतांवर केवळ ‘हम’चे उमेदवारच प्रभाव टाकू शकतात. पासवान यांच्या लोजपाइतक्या जागा आपल्याला मिळायलाच हव्यात अन्यथा वेगळा विचार करावा लागेल, अशी धमकीही मांझींनी दिली होती. बिहारचे प्रभारी केंद्रीय मंत्री अनंतकुमार, धर्मेंद्र प्रधान, महासचिव भूपेंद्र यादव यांनी हरप्रकारे मांझींची समजूत घालून पाहिली मात्र ते ऐकायला तयार नव्हते. अखेर रविवारी रात्री २0 जागांवर तडजोड झाली. ‘हम’च्या काही उमेदवारांना भाजपतार्फे लढवण्यास ते तयार झाल्यावर मांझी आणि पासवान या दोघांचेही हसरे चेहरे पत्रपरिषदेनंतर पाहायला मिळाले.पत्रपरिषदेत अमित शहा नेहमीपेक्षा अधिक प्रसन्नचित्त होते. याचे आणखी एक कारण मजलिस इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम)चे नेते असदुद्दीन ओवेसींनी शनिवारी अचानक बिहारच्या सीमांचल भागातल्या किशनगंज, पूर्णिया, अररिया आणि कटिहार अशा चार जिल्ह्यात निवडणूक लढवण्याची घोषणा केली. या भागात मुस्लिम मतदार जवळपास ४५ लाखांच्या आसपास आहेत. तथापि सीमांचल भागात मुस्लिम मते विखुरण्याचा आजवरचा इतिहास नाही. गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत लालूप्रसादांचा राजद आणि नितीशकुमारांचा जद(यु) एकमेकांच्या विरोधात लढत होते. त्यावेळी बिहारमधे अन्य भागात मुस्लिमांची मते जरूर विखुरलीमात्र सीमांचल भागात लालूंच्या राजदला ७0 टक्के मुस्लिमांचे एकतर्फी मतदान झाले.अमित शहा यांची डोकेदुखी वाढवणाऱ्या आणखी दोन बातम्या म्हणजे मांझीना जागा वाढवून दिल्यानंतर चिराग पासवान यांनी जागा वाढवून घेण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. दुसरी बातमी रालोआचा घटक पक्ष शिवसेना बिहारमधे ५0 जागांवर निवडणूक लढणार आहे. पक्षाचे राज्यसभेतील नेते संजय राऊत यांनी ही घोषणा केली.बिहारमधे किमान ७0 जागा अशा आहेत की दोन्ही आघाड्यांचे तुल्यबळ उमेदवार परस्परांसमोर उतरल्यास निवडणुकीतला जय पराजय १ ते २ हजार मतांच्या फरकानेही होऊ शकेल. अशावेळी छोट्या पक्षांच्या उमेदवारांनी मिळवलेली मते निर्णायक ठरू शकतात. या संदर्भातल्या कोणत्याही प्रश्नावर अमित शहा यांनी भाष्य करण्याचे टाळले.महायुतीत आधीच फूट -शहा जनता परिवारातील नेते मुलायमसिंग यादव बाहेर पडल्यामुळे महायुतीत आधीच फूट पडली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी १७ वर्षांपासूनची युती तोडत भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. रालोआ निश्चितच सत्तेवर येईल. १२ लाख कोटींच्या घोटाळ्यात गुंतलेल्या काँग्रेससोबत युती करीत नितीशकुमार यांनी भ्रष्टाचारमुक्त बिहारचे आश्वासन दिले आहे. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची कारकीर्द जंगलराज म्हणून ओळखली जाते. त्यांच्याच साथीने नितीशकुमार गुन्हेगारीमुक्त बिहारचे वचन देत आहेत, असे शहा म्हणाले.