मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात विविध मतदारसंघांमध्ये ३ हजार ७५४ उमेदवारांनी ५ हजार १६३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली.नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात सर्वाधिक १३५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापाठोपाठ पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ८५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सर्वात कमी प्रत्येकी ४ नामनिर्देशनपत्रे मुंबईतील माहिम आणि शिवडी या मतदारसंघांमध्ये दाखल करण्यात आली.४३ कोटींचा मुद्देमाल जप्तआचारसंहिता कालावधीत निवडणूक यंत्रणा, पोलीस, आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत आतापर्यंत रोख रक्कम, दारु, मादक पदार्थ, सोने-चांदी आदी स्वरुपात ४३ कोटी ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भरारी पथके (एफएस), स्थिर सर्व्हेक्षण पथके (एसएसटी), पोलीस, आयकर आणि सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत आजपर्यंत ९ कोटी ५३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय ९ कोटी ७१ लाख रुपये किमतीची दारु जप्त करण्यात आली. यशिवाय १५ कोटी ७लाख रुपयांचे मादक पदार्थ जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात ३ हजार ७५४ उमेदवारांचे अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 6:16 AM