नोटाबंदी ही चूक नव्हे, तर जनता व छोट्या व्यावसायिकांवर आक्रमण होतं- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 06:54 PM2018-08-30T18:54:31+5:302018-08-30T18:54:49+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Nomination is not a mistake, but people and small businesses are attacked - Rahul Gandhi | नोटाबंदी ही चूक नव्हे, तर जनता व छोट्या व्यावसायिकांवर आक्रमण होतं- राहुल गांधी

नोटाबंदी ही चूक नव्हे, तर जनता व छोट्या व्यावसायिकांवर आक्रमण होतं- राहुल गांधी

Next

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राफेल करार आणि नोटाबंदीवरून राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. नोटाबंदी ही चूक नव्हती, तर जनता आणि छोट्या व्यावसायिकांवर आक्रमणं होते, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. देशातल्या 15 मोठ्या उद्योजकांच्या भल्यासाठीच मोदी सरकारनं नोटाबंदी केली. नोटाबंदीमुळे देशाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

भ्रष्टाचा-यांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठीच नोटाबंदी केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. नोटाबंदीच्या माध्यमातून सरकारनं जनतेवर आक्रमण केले. नोटाबंदीमुळे छोट्या व्यापा-यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.



भाजपा अध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या गुजरातमधल्या बँकेत 700 कोटींचा घोटाळा समोर आला होता. या घोटाळ्यात 700 कोटी रुपये काळ्याचे पांढरे करण्यात आले. जनतेच्या खिशातील पैसा उद्योजकांच्या गल्ल्यात जमा करण्याचे काम मोदी सरकारनं केले. जनतेची लुबाडणूक करण्याचं काम मोदींनी केलं आहे.
नोटाबंदीच्या निर्णयातून काहीही निष्पन्न झालेलं नाही. नोटाबंदी हा जुमला नव्हे, तर एक मोठा भ्रष्टाचार ठरला आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे. प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा होतील, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल, बेरोजगारी संपवण्याचं मोदींनी दिलेलं आश्वासनं हवेत विरली आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

 

Web Title: Nomination is not a mistake, but people and small businesses are attacked - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.